मुंबई : स्मार्ट फोनमध्ये Google Maps, Gmail आणि YouTube आजकाल जवळजवळ प्रत्येक युजर वापरतात. याची युजर्सना इतकी सवय लागली आहे की, ते मोठ्या प्रमाणात या सर्व अॅप्सवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत, जर हे अॅप्स अचानक काम करणे थांबवले, तर काय होईल याचा विचार करा. लोक आता हे अॅप्स फोनमध्ये नाही अशी कल्पना ही करु शकत नाही. परंतु काही फोनमध्ये हे बंद होणार आहे. त्यामुळे तुमचा फोन तर या यादीत नाही ना हे आधी पाहून घ्या.
आता जुने अँड्रॉइड वर्जनवरील फोनमध्ये लाखो युजर्स Google Maps, Gmail आणि YouTube वापरत आहेत. परंतु आता ते बंद केले जाणार आहे. ज्यामुळे आता युजर्स या अॅप्सना आपल्या फोनमध्ये साइन-इन करु शकणार नाही.
जे युजर्स अद्याप Android 2.3 डिव्हाइसवर Google खाते वापरत आहेत त्यांना या यादीतुन काढले जाईल. गुगलची ही जुनी आवृत्ती डिसेंबर 2010 मध्ये लाँच झाली. परंतु आता काही टेकनीकल गोष्टींमुळे कंपनी जुन्या अँड्रॉइड सिस्टीमसाठी सपोर्ट बंद करत आहे.
Google कडून असे म्हटले गेले आहे की, ते या व्यासपीठासाठी समर्थन मागे घेत आहे. युजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीचे मत आहे. नवीन नियम 27 सप्टेंबरपासून लागू होईल. म्हणजेच, 27 सप्टेंबरनंतर तुम्ही जुन्या अॅन्ड्रॉइड, ओएसवर आधारित स्मार्टफोनमध्ये हे अॅप्स वापरू शकणार नाही.
बंद होणाऱ्या अॅप्समध्ये YouTube, Google Play Store, Google Maps, Gmail, Google Calendar सारख्या अनेक अॅप्सचा समावेश आहे. Google अनेकदा अँड्रॉइडच्या जुन्या सॉफ्टवेअरच्या आवृत्त्या काढून टाकते आणि त्याच्या जागी नवीन आवृत्त्या लाँच करत आहे.
जर त्यांचे डिव्हाइस सपोर्ट देत नसेल तर, गूगलने वापरकर्त्यांना त्यांचे फोन अँड्रॉईड 3.0 किंवा नंतरचे फोन अपडेट करण्यास सांगितले आहे.