तुमचा Friends कुठे फिरतोय? या जुगाडाने जाणून घ्या Live Location; हे Apps आपले काम करेल सोपे

 Friends Loaction : तुम्हालाही एखाद्या मित्राचे लोकेशन जाणून घ्यायचे असेल (Live Location Trace) तर हा एक सोपा मार्ग आहे. संकटात अडकलेल्या मित्राचे लोकेशन शोधू शकता. (Friends Live Location Trace Know)

Updated: Sep 1, 2022, 09:23 AM IST
तुमचा Friends कुठे फिरतोय? या जुगाडाने जाणून घ्या Live Location; हे Apps आपले काम करेल सोपे title=

मुंबई : Friends Loaction : तुम्हालाही एखाद्या मित्राचे लोकेशन जाणून घ्यायचे असेल (Live Location Trace) तर हा एक सोपा मार्ग आहे. आम्ही सांगत असलेल्या पद्धतीद्वारे तुम्ही कोणत्याही संकटात अडकलेल्या मित्राचे लोकेशन शोधू शकता. (Friends Live Location Trace Know)

अनेक वेळा काही मित्र असे असतात ते आपले लोकेशन दुसऱ्याला कळू देत नाहीत. बरेचवेळा यावेळी मित्र कुठे असेल हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण ही गोष्ट जाणून घेण्यासाठी आपण एकतर कॉल करतो किंवा मेसेज करतो. तुम्हालाही एखाद्या मित्राचे लोकेशन जाणून घ्यायचे असेल, तर हा एक सोपा मार्ग आहे. यासाठी तुमच्या मित्राच्या फोनमध्ये मोबाईल डेटा/वाय-फाय आणि जीपीएस चालू असणे आवश्यक आहे. तरच आपण त्यांचे लाईव्ह लोकेशन पाहू शकतो. पण आम्ही सांगत असलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही कोणत्याही संकटात अडकलेल्या मित्राचे लोकेशन जाणून घेऊ शकता…

गूगल मॅप्स आणि व्हॉट्सअ‍ॅप मदतीला आहेत

भारतातील बहुतांश लोक गुगल मॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला गूगल मॅप आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लाईव्ह लोकेशनची माहिती मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया येथे सांगत आहोत.

 Location शेअरिंग चालू असणे आवश्यक  

तुमच्या मित्राला गूगल मॅपवरील (Google Maps) पर्यायांमध्ये जाऊन लोकेशन शेअरिंगच्या पर्यायावर जावे लागेल. त्यानंतर तो लोकेशन शेअर करू शकतो. त्याच वेळी, व्हॉट्सअ‍ॅपची प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्हाला चॅट बॉक्समध्ये जावे लागेल आणि प्लस चिन्हावर क्लिक करताच लोकेशन पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथून थेट लोकेशन देखील पाठवता येते.

व्हॉट्सअ‍ॅपवर (whatsapp helps you) सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा मित्र 1 तास लाइव्ह लोकेशन टाइम करत असेल तर तो मित्र आता कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्ही 1 तास पाहू शकता.