नवी दिल्ली : तुम्ही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, फोर्ड इंडियाने आपली नवी गाडी लॉन्च केली आहे.
फोर्ड इंडियाने आपली कॉम्पॅक्ट SUV ईकोस्पोर्टचं टॉप व्हेरिएंट टायटेनियम प्लस पेट्रोलला आता मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये लॉन्च केली आहे.
आतापर्यंत ही गाडी केवळ 6-स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध होती मात्र, आता मॅन्युअलमध्ये लाँन्च करण्यात आली आहे.
ईकोस्पोर्ट टायटेनियम प्लस पेट्रोल मॅन्युअल गाडीची दिल्लीतील एक्स-शो रुम किंमत 10.47 लाख रुपये आहे. खास बाब म्हणजे ही ऑटोमेटिक व्हेरिएंटहून जवळपास 83,000 रुपये स्वस्त आहे. त्यामुळे ईकोस्पोर्ट गाडी खरेदी करणाऱ्यांची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
ईकोस्पोर्ट टायटेनियम पेट्रोलमध्ये 1.5 लीटरचं 3- सिलेंडर ड्रेगन सीरिजचं इंजिन देण्यात आलं आहे. हे 123 पीएसची पावर आणि 150 एनएमचं टॉर्क देतं. मॅन्युअल व्हेरिएंट एका लीटरमध्ये 17 km चा मायलेज देण्याचा दावा कंपनीने केला आहे. तर, ऑटोमेटिक व्हेरिएंट 14.8 km प्रति लिटर देण्याचा दावा कंपनीने केलाय.
फिचर्सचा विचार केला तर या कारमध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्राईड ऑटो सपोर्ट असलेलं 8.0 इंचाची टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम, रियर मार्किंग कॅमेरा, सेंसर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, क्रूझ कंट्रोल, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, रेन सेसिंग वायपर, ऑटोमेटिक हेडलॅम्प आणि 17 इंचाचे अलॉय व्हील देण्यात आले आहेत. तसेच सेफ्टीसाठी कारमध्ये 6 एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि EBD सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
सध्या मार्केटमध्ये कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये अनेक गाड्या आल्या आहेत. त्यामध्ये फोर्ड ईकोस्पोर्टची स्पर्धा मारुती सुजुकी, विटारा ब्रेझा, होंडा डब्ल्यूआर-व्ही आणि टाटा नेक्सन यांच्यासोबत आहे.