... अशा प्रकारे करा फेसबुकवरचे व्हिडिओ डाउनलोड

डाउनलोड कसे करायचे माहिती नसल्यामुळे युजर्स नाराज होतात.

Updated: Jan 28, 2019, 02:43 PM IST
... अशा प्रकारे करा फेसबुकवरचे व्हिडिओ डाउनलोड   title=

नवी दिल्ली:  अनेकदा असे होते की युजर्सला फेसबुकवर काही व्हिडिओ आवडतात. परंतु, ते डाउनलोड कसे करायचे माहिती नसल्यामुळे युजर्स नाराज होतात. मात्र, आता फेसबुक युजर्सला दिलासा मिळणार आहे. कारण, फेसबुकवरुन व्हिडिओ कसा डाउनलोड करायचा याची माहिती युजर्सला मिळणार आहे. यानंतर युजर्सला त्यांच्या आवडीचे व्हिडिओ डाउनलोड करुन पाहता येणार आहेत. लॅपटॉप किंवा स्मार्टफोनमध्ये फेसबुकचे व्हिडिओ डाउनलोड करायचे असल्यास fbdown.net वेबसाइटच्या माध्यमातून व्हिडिओ डाउनलोड करु शकता. यासाठी युजर्सला काही प्रकिया पूर्ण करण्याची गरज आहे. 

 

 लॅपटॉपवर डाउनलोड करण्याची प्रक्रिया 

 

- युजरला जो व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे, त्या व्हिडिओच्या उजव्या बाजूस क्लीक करा.
- 'शो व्हिडिओ युआरएल'मधून (URL) व्हिडिओचा 'युआरएल' कॉपी करा.
- त्यानंतर कॉपी केलेला 'युआरएल' fbdown.net या वेबसाइटवर जाउन सर्च बारमध्ये पेस्ट करा.
- 'युआरएल' पेस्ट केल्यानंतर त्याठिकाणी डाउनलोड ऑप्शन दिसेल, त्यावर क्लीक करुन व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहे.

 

ऍन्ड्राइड स्मार्टफोनवर डाउनलोड करण्याची प्रक्रिया

 

-फेसबुक ऍपमध्ये गेल्यानंतर जो व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे. त्यावर क्लीक करा.
- व्हिडिओवर क्लीक केल्यानंतर तुम्हाला शेअर बटण दिसणार त्यावर क्लीक करा. 
- त्यानंतर सर्व पर्याय दिसणार, त्यामधून लिंक हा ऑप्शन निवडून लिंक कॉपी करा.
- तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणत्याही ब्राउजरच्या मदतीने fbdown.net उघडा. 
- कॉपी केलेली लिंक fbdown.net सर्च बारमध्ये पेस्ट करा.