Flipkart Sale: तब्बल 46 हजारांची सूट! आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतोय Samsung चा Foldable Phone

तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट-अॅमेझॉनवर (Flipkart-Amazon) मिळत असलेल्या भरघोस डिस्काऊंटचा तुम्ही फायदा घेऊ शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये (Flipkart Sale) सॅमसंगचा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत मिळत आहे.  

Updated: Jan 18, 2023, 02:15 PM IST
Flipkart Sale: तब्बल 46 हजारांची सूट! आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतोय Samsung चा Foldable Phone title=

तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट-अॅमेझॉनवर (Flipkart-Amazon) मिळत असलेल्या भरघोस डिस्काऊंटचा तुम्ही फायदा घेऊ शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये (Flipkart Sale) एक स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत मिळत आहे. हा स्मार्टफोन २०२१ मध्ये लाँच झालेला Samsung Galaxy Z Flip 3 आहे. हा स्मार्टफोन तुम्ही ५० हजारात खरेदी करु शकता. 

फ्लिप किंवा क्लॅमशेल डिझाईनमधील सेगमेंटमध्ये जास्त पर्याय उपलब्ध नाहीत. जर तुम्हाला फोल्डेबल फोन हवा असल्यास हा मोबाइल खरेदी करु शकता. यामध्ये काही मर्यादाही आहेत. तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. 

काय आहे Samsung Galaxy Z Flip 3 वरील ऑफर?

फ्लिपकार्ट सेलमधून तुम्ही हा स्मार्टफोन 49 हजार 925 रुपयांत खरेदी करु शकता. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळतो. या हँडसेटवर 46 हजार 74 रुपयांची सूट मिळत आहे. स्मार्टफोनवर कोणतीही खास बँक ऑफर किंवा अतिरिक्त ऑफर नाही आहे. 

यामध्ये तुम्ही एक्स्चेंज ऑफरचाही फायदा घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला चार हजारांची अतिरिक्त सूट मिळत आहे. हा स्मार्टफोन 256 जीबी मध्येही उपलब्ध असून, तोदेखील खरेदी करु शकता. मात्र त्याची किंमत जास्त आहे. 256जीबी स्टोरेज व्हेरियंटसाठी तुम्हाला 88 हजार 999 रुपये खर्च करावे लागतील. हा स्मार्टफोन काळा आणि क्रीम रंगात उपलब्ध आहे. 

काय आहेत फिचर्स ?

क्लॅमशेल डिझाइनमधील हा मोबाइल सध्या सर्वात कमी किंमतीत मिळत आहे. जर तुम्हाला नवीन डिझाईनमधील फोन खरेदी करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही हा खरेदी करु शकता. यामध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो Full HD+ रेज्योलूशनसह मिळतो. 

फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्याची मेन लेन्स 12MP आहे. याशिवाय 12MP ची सेकंडरी लेन्सही मिळते. फ्रंटमध्ये कंपनीने 10MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. यामध्ये सेकंडरी स्क्रीनही देण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक गोष्टी सहज होतात. मोबाइलमध्ये 3300mAH ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.