दिवाळीचा ऑनलाईन बंपर धमाका, ७० टक्के डिस्कांऊट

दिवाळी काही दिवासांवर येऊन ठेवली आहे. ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या डिस्कांऊट ऑफर देत आहेत. यात ऑनलाईन बाजारात आघाडीवर दिसत आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या कंपन्यांनी दिवाळी निमित्त ग्राहकांच्यासाठी चांगली ऑफर देऊ केलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 14, 2017, 12:54 PM IST
दिवाळीचा ऑनलाईन बंपर धमाका, ७० टक्के डिस्कांऊट title=

मुंबई : दिवाळी काही दिवासांवर येऊन ठेवली आहे. ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या डिस्कांऊट ऑफर देत आहेत. यात ऑनलाईन बाजारात आघाडीवर दिसत आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या कंपन्यांनी दिवाळी निमित्त ग्राहकांच्यासाठी चांगली ऑफर देऊ केलेय.

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर १४ ते १७ ऑक्टोबर दरम्यान विविध वस्तूंवर डिस्कांऊट दिला जाणार आहे. तसेच काही बँकांनीही आपल्या ग्राहकांना खूष करण्यासाठी या ऑफरमध्ये डिस्काऊंट आहे. 

यामध्ये अॅमेझॉनवर एसबीआयच्या डेबीट अथवा क्रेडिट कार्डवरून वस्तू ऑर्डर केल्यास १० टक्के अधिकचा डिस्काऊंट मिळणार आहे. तर फ्लिपकार्टवर हीच ऑफर एचडीएफसी बँकेकडून देण्यात आलेय.

फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी एस- ७ हा स्मार्टफोन २९,९९० रूपयाला मिळणार आहे. ज्याची मूळ किंमत ४६ हजार रूपये आहे. तर एक्सचेंजमध्ये हा फोन ६६९० रूपयांमध्येही मिळू शकतो. 

तसेच  रेडमी नोट ४ (६४ जीबी) वर २ हजार रूपये सूट आहे. त्यामुळे हा फोन ग्राहकांना ११ हजार रूपयांना मिळेल. डिस्काऊंटमुळे मोटो-इ ४ प्लस हा स्मार्टफोन ९४९९ ला मिळणार आहे. तसेच लिनोवो फोनवर डिस्काऊंट देण्यात आले आहे.   

मोबाईल शिवाय एलईडी टिव्ही, वॉशिंग मशीन, लॅपटॉप आदींवर  डिस्काऊंट देण्यात आला आहे. अॅमेझॉनवर कपड्यांवर ७०  ते ८० टक्के डिस्काऊंट आहे. संगणक आणि इतर इलेक्ट्रानिक्स् साहित्यावरही ५५ टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट आहे.