Flipcart Electronics Sale: 'या' स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट

  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर आजपासून नवीन सेल सुरु झालाय.जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

Updated: May 24, 2022, 02:49 PM IST
Flipcart Electronics Sale: 'या' स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट title=

मुंबई :  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर आजपासून नवीन सेल सुरु झालाय. या सेलमध्ये तुम्हाला स्वस्तातल्या स्वस्त आणि महागड्यातल्या महागड्या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळतोय. जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

फ्लिपकार्टचा इलेक्ट्रॉनिक सेल सुरु झाला आहे. या सेलला आज 24 मे पासून सुरूवात झाली असून येत्या 29 मे पर्यंत हा सेल सुरू असणार आहे. या सेलमध्ये तुम्ही डिस्काउंटमध्ये अनेक स्मार्टफोन खरेदी करू शकता.

विशेष म्हणजे या सेलमध्ये तुम्हाला डिस्काउंट सोबत No Cost EMI, Exchange Deal आणि Bank offer देखील मिळत आहेत.तसेच RBL Bank आणि kotak Bank कार्डवर 10 टक्के झटपट सूट उपलब्ध आहे. या सर्व ऑफर्स मिळून तुम्ही जर फोन खरेदी केला तर तूमची मोठी बचत होण्याची शक्यता आहे.  

कोणत्या स्मार्टफोनवर ऑफर ? 
फ्लिपकार्ट सेलमध्ये Iphone सह Vivo, Realme, Oppo, samsung Galaxy,Poco अशा स्मार्टफोनवर मोठा डिस्काऊंट मिळतोय. 

जर तुम्हाला 6000mAh बॅटरीसह मजबूत फोन हवा असेल तर तुम्ही Samsung Galaxy F12 खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये 48MP कॅमेरा, sAMOLED डिस्प्ले आहे. या हँडसेटवर सेलमध्ये मोठी सुट मिळतेय.  

Poco C31 या फोनवर देखील सुट मिळतेय, यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, फिंगरप्रिंट सेन्सर, 5000mAh बॅटरी अशी सर्व फिचर्स मिळतायत. वरील स्मार्टफोनसह आणखीन अनेक स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळतोय. येत्या 29 मे पर्यत तुम्हाला या सेलचा लाभ घेता येणार आहे.