नवी दिल्ली : राज्यात आणि देशात विजेचा किती तुटवडा आहे हे तर आपण जाणताच. पण, देशात सध्या सुरू असलेला प्रयोग जर व्याप्त स्वरूपात यशस्वी झाला. तर, देशातील विजेच्या तुटवड्याची समस्या सुटण्यास मोलाची मदत होणार आहे. कारण, देशात आता चिप्स, बिस्किट, केक आणि चॉकलेट यांसारख्या पदार्थांना वेस्टन म्हणून वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासूनही वीज निर्माण केली जाणार आहे.
वाचून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. पण, देशात हा प्रयोग सुरूही झाला आहे. गाझीपूर येथे हा प्रयोग सुरू असून, कचरा आणि टाकाऊ प्लास्टिकपासून वीज निर्मितीचा प्रयोग येथे राबवला जात आहे. विशेष असे की, देशात सर्वात मोठे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई, चंढगढ, डेहराडून यांसह देशभरातील इतर आठ शहरांमध्येही हा प्रयोग लवरच राबवला जाणार आहे.
भारतीय प्रदुषण नियंत्रण संस्था (आयपीसीए) या बिगरशासकीय संस्थेचे निर्देशक आशीष जैन यांनी सांगितले की, गाजीपुर येथील वीज निर्मिती प्रकल्पात केला जात आहे. जैन यांनी सांगितले की, जगभराच्या तुलनेत भारतात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यामुळे प्लास्टिकपासून वीज निर्मिती केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
विशेष असे की, बिस्कीट, नमकीन पदार्थ, केक, चिप्स यांच्यासह अनेक पदार्थांना चमकणाऱ्या वेस्टनात गुंडाळले जाते. त्यासाठी मल्टी लेयर्ड प्लास्टीकचा (एमएलपी) वापर केला जातो. या प्लास्टिकमध्ये खाद्यपदार्थ सुरक्षित तर राहतातच. पण, त्यांच्या कचऱ्याचे काय करायचे हा प्रमुख सवाल निर्माण होऊन बसतो. कारण, हे प्लास्टीक विघटन होत नाही. म्हणूनच आयीपीसीएने हे प्लास्टीक गोळा करून वीज निर्मिती प्रकल्पापर्यंत पोहोचवण्याचा विडा उचलला आहे. दिल्ली एनसीआरमध्ये या संस्थेने आतापर्यंत 6 ते 7 टन प्लास्टिक जमा करून वीज निर्मिती प्रकल्पापर्यंत पोहोचवले आहे.
पेप्सीको, नेस्ले, डाबर, यांसारख्या कंपन्यांनी या उपक्रमासाठी पुढे आले पाहिजे असेही जैन यांनी म्हटले आहे.