Electric Vehicle: 3 वर्षात इलेक्ट्रिक टू व्हीलरचे पैसे वसूल, असे करा नियोजन

Electric Vehicle Price in India:  तुम्ही गाडी किंवा टू व्हिलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे नियोजन हवे. आता 3 वर्षात इलेक्ट्रिक टू व्हीलरचे पैसे वसूल होतील, याबाबत तुम्ही असे नियोजन करु शकता. त्याआसाठी अधिक जाणून घ्या, हे नियोजन कसे करायचे.

Updated: Sep 10, 2022, 01:09 PM IST
Electric Vehicle: 3 वर्षात इलेक्ट्रिक टू व्हीलरचे पैसे वसूल, असे करा नियोजन  title=

World EV Day 2022: जगभरात 9 सप्टेंबर जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिन (World Electric Vehicle Day) म्हणून साजरा केला जातो. भारतीय बाजारात  इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळेच बऱ्याच लहान-मोठ्या कंपन्यानी या व्यवसायात चांगलीच हजेरी लावली आहे.  उन्हाळ्यात या इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याची प्रकरणं समोर आलीत आणि या कारणांमुळे ग्राहकांच्या मनात इलेक्ट्रिक वाहन खरेदी करावं की नाही? असे भीतीचे वातावरण निर्माण झाले. याव्यतिरिक्त अजुन एक प्रमुख कारण आहे या इलेक्ट्रिक वाहनांची किंमत देखील जास्त आहे. इलेक्ट्रिक कार अजुनही सामान्य माणसांच्या खिशाला न परवडणारी आहे. तर दुसरीकडे इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या किंमतीत कपात झालेली पाहायला मिळत आहे. हे पेट्रोल इलेक्ट्रिक टू-व्हीलरपेक्षा महाग नाही. या वाहनांचा दीर्घकालीन विचार केला तर ते पेट्रोल वाहनांपेक्षा स्वस्त आहेत. भविष्‍याची सुरक्षितता लक्षात घेऊन अशा प्रकारच्या योजना आखल्या जातात. ही एक जागतिक पातळीवरील चळवळ आहे.

पूर्ण गणित
आमही तुम्हाला सांगत आहोत, इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या होणाऱ्या खर्चावर तुम्ही कशी बचत करु शकता. यामध्ये तुम्हाला ईवी चार्जिंगमध्ये (EV Charging) खर्च होणाऱ्या यूनिट आणि पेट्रोलचा खर्च या दोघांची तुलना करायला लागेल. 
पेट्रोलवर चालणारे दुचाकी वाहन हे आपल्याला महाग पडेल कारण त्यात नेहमी गरजेप्रमाणे पेट्रोल टाकावे लागते. पण इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये तुम्हाला फक्त चार्जिंगवर खर्च करावा लागेल. आम्हाला या बातमीत तुम्हाला सांगायला आवडेल की,  इलेक्ट्रिक टू-व्हीलर ही पेट्रोल दुचाकी वाहनापेक्षा कशी स्वस्त आहे.

तुम्ही कसे कराल, हे नियोजन, ते जाणून घ्या
1. समजा, तुम्ही 1 लाख रुपयांत इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करता.
2. इलेक्ट्रिक टू-व्हीलर चार्ज करायला जवळजवळ 2 यूनिट लागतात. 
3. जर तुमच्या शहरात 1 यूनिट वीजची किंमत 8 रुपये आहे तर या हिशोबाप्रमाणे तुमच्या एका दिवसाचा खर्च 16 रुपये इतका होईल. 
4. अशाप्रकारे इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या चार्जींगचा एका महिनाचा खर्च जवळजवळ 480 रुपये इतका होईल. 
5. या हिशोबाने एका वर्षाचा इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या चार्जींगचा खर्च 5760 रुपये इतका असेल. 
6. जर तु्म्ही पेट्रोल दुचाकी वाहनात दररोज 100 रुपये खर्च करता, तर त्या हिशोबाने महिन्याला 3000 रुपये खर्च होतात. 
7. अशाप्रकारे पेट्रोल दुचाकी वाहनात वर्षभर 36,000 रुपये खर्च होतात.
8. जर आता पेट्रोल दुचाकी वाहनाच्या 36,000 रुपयांमधून इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे 5760 रुपये वजा केले, तर एका वर्षात सुमारे 30,000 रुपयांची बचत होते.
9. या हिशोबाप्रमाणे इलेक्ट्रिक टू-व्हीलरची खरेदी किंमत 1 लाख रुपये 3 वर्षात 2 महिन्यांमध्ये वसूल करु शकता. 
10. याचसोबत, काही कंपन्या तर इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या बॅटरीवर 50 हजार किलोमीटर किंवा 5 वर्षांपर्यंतची वॉरंटी देत ​​आहेत.

बॅटरी डिस्चार्ज टेन्शन!
बरेचसे लोक इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करायचा विचार करत नाही कारण त्यात चार्जिंग करायचे टेंशन असते. आल्याला कळवण्यात आनंद होईल की, आजकल कंपन्या इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये अशा बॅटरी लावणार आहेत, ज्यांना एकदा चार्ज केल्यावर 80 ते 100 किमी चा प्रवास करु शकतील.