मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकाजवळ फोन आहे आणि आपण तो दररोज वापरातो. फोन घेताना आपण त्याच्या प्रत्येक डिटेल्सबद्दल जाणून घेतो. परंतु आपण चार्जरबद्दल बारकाईने लक्ष देत नाही. फोन चालण्यासाठी त्याला चार्जिंगची आवशकता असते, त्यामुळे आपल्या फोनला जेव्हाही चार्जिंगची गरज लागते आपण त्याला चार्ज करतो आणि वापरतो. परंतु तुम्ही कधी फोनच्या चार्जरला नीट पाहिलं आहे का? फोनच्या चार्जरवर त्याचे काही तपशील लिहिलेले असतात आणि काही खुणाही बनवल्या जातात. हे चिन्ह फोनच्या चार्जरबद्दल आपल्याला काहीतरी महिती सांगत असतात. परंतु अपुऱ्या माहितीमुळे आपण त्या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही.
आज आम्ही तुम्हाला चार्जरमधील काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
तुम्ही बऱ्याच चार्जरवरती चिन्हाच्या रुपात चौरस पाहिले असतील. हे एकामध्ये एक असे दोन चौरस असतात. जे चार्जरचे वैशिष्ट्य आपल्याला सांगतात, परंतु त्याचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घ्या.
अनेक चार्जरवर चार्जरच्या बाबतीत माहिती लिहिलेली असते, की ते चार्जर कशा प्रकारचे आहे आणि ते कसे काम करते. यामध्ये बहुतांश तांत्रिक माहिती असते. तसेच अनेक लोगो असतात आणि प्रत्येक चिन्ह तांत्रिक वैशिष्ट्याबद्दल सांगते.
हे लक्षात घ्या की, काही चार्जरला अर्थिंगची आवश्यकता नसते आणि इतर कोणत्याही सुरक्षा कनेक्शनची आवश्यकता नसते, जे त्या चार्जरवरती नमूद करण्यात आलेले असते. त्यावर असेही सांगते की DC आउटपुट वायर AC इनपुटसह वेगळे केले जाते.
हे सांगते की, ते दुहेरी इन्सुलेटेड आहे म्हणजेच विजेच्या बाबतीत दुप्पट सुरक्षित आहे. ज्याला क्लास सेकेंड चिन्ह देखील म्हणतात. यामुळे इलेक्ट्रिक शॉक लागण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे, ज्या चार्जरवर असे चिन्ह बनवलेले असते, ते चार्जर अगदी सुरक्षित असते. ज्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या फोनला कोणताही धोका नाही.