या ३ सेटिंग्स बदलताच तुमचा स्मार्टफोन होईल अधिक फास्ट

सध्याच्या काळात प्रत्येकाकडेच स्मार्टफोन पहायला मिळत आहेत. तुमच्याकडेही स्मार्टफोन आहे मात्र, वारंवार फोन हँग होत असल्याने तुम्ही त्रस्त आहात? तर मग आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. कारण आम्ही तुम्हाला अशा काही सेटिंग्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या फोन अॅडव्हान्स होईल.

Updated: May 26, 2018, 10:02 PM IST
या ३ सेटिंग्स बदलताच तुमचा स्मार्टफोन होईल अधिक फास्ट title=
File Photo

मुंबई : सध्याच्या काळात प्रत्येकाकडेच स्मार्टफोन पहायला मिळत आहेत. तुमच्याकडेही स्मार्टफोन आहे मात्र, वारंवार फोन हँग होत असल्याने तुम्ही त्रस्त आहात? तर मग आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. कारण आम्ही तुम्हाला अशा काही सेटिंग्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या फोन अॅडव्हान्स होईल.

या सेटिंग्स केल्यानंतर तुमचा फोन सुरक्षित तर होईलच त्यासोबतच अधिक वेगवानही होईल. काही स्मार्टफोन्समध्ये या सेटिंग्स बायडिफॉल्ट असतात तर काही फोन्समधअये त्या मॅन्युअली सेट कराव्या लागतात. चला तर मग पाहूयात काय आहेत या सेटिंग्स...

नोटिफिकेशन्स हाईड करा

तुमच्या फोनवर येणारे नोटिफिकेशन्स तुम्ही हाईड करु शकता. फोनच्या स्क्रिनवर येणाऱ्या WhatsApp आणि Facebook च्या नोटिफिकेशनने युजर्स अनेकदा त्रस्त होतात. हे नोटिफिकेशन तुम्हाला वारंवार त्रस्त करु नये तसेच इतरांनी पाहू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सेटिंग बदलावी लागेल. त्यासाठी Settings > Notifications आयकॉनवर टॅप करा. मग, On the lock screen यावर टॅप करा. यानंतर Hide sensitive notification content सिलेक्ट करा.

Ads पासून सुटका

तुमच्या स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या अॅड्स (जाहीरातींना) तुम्ही कंटाळले आहात. तर मग, Settings > Google > Ads > Opt out of Ads Personalization ला ऑन करा. यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रिनवर येणाऱ्या अॅड्स दिसणार नाहीत.

व्हायरस पासून फोनची सुरक्षित ठेवा

तुमचा फोन व्हायरसपासून सुरक्षित ठेवायचा असेल तर तो प्रोटेक्ट करणं आवश्यक आहे. फोनमध्ये अनेकदा अॅप्सच्या माध्यमातून व्हायरस प्रवेश करतो. मात्र, एक सेटिंग बदलल्यास तुमचा फोन व्हायरस मुक्त होऊ शकतो. त्यासाठी Settings > Google > Security > Google Play Protect > Turn on करावं लागेल.