BSNLच्या प्लानने उडवली Jio-Airtel ची झोप, 110 दिवस रोज 2GB डेटा; तोही कमी किमतीत

​BSNL Prepaid Plan News : भारत दूरसंचार निगम (BSNL) या सरकारीने कंपनीने अनेक कंपन्यांची झोप उडवली आहे. BSNL ने तगडा प्रीपेड प्लॅान लॉन्च केला आहे.  

Updated: Feb 11, 2022, 03:30 PM IST
BSNLच्या प्लानने उडवली Jio-Airtel ची झोप, 110 दिवस रोज 2GB डेटा; तोही कमी किमतीत title=

मुंबई : BSNL Prepaid Plan News : भारत दूरसंचार निगम (BSNL) या सरकारीने कंपनीने अनेक कंपन्यांची झोप उडवली आहे. BSNL ने तगडा प्रीपेड प्लॅान लॉन्च केला आहे. तर दुसरीकडे Jio, Airtel आणि Vodafone Idea ने त्यांच्या प्लानच्या किमती वाढवल्या आहेत. असे असताना कमी किमतीत सर्व काही देण्याचा प्रयत्न BSNL ने केला आहे. 

बीएसएनएलने कमी किंमतीचा प्लान ऑफर केला आहे आणि लोकांना त्याकडे आकर्षित करत आहे. BSNL ने आता गुपचूप एक नवीन प्लान लॉन्च केला आहे, ज्यामध्ये 110 दिवसांची वैधता मिळत आहे आणि त्याचबरोबर दररोज 2GB डेटा मिळत आहे. 

BSNL चा 666 रुपयांचा मोठा प्लान

BSNL के नए Plan ने उड़ाई Jio-Airtel की नींद, कम कीमत में 110 दिन तक रोज पाएं 2GB डेटा और इतना कुछ

BSNL च्या 666 रुपयांच्या प्लानमध्ये 110 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यामध्ये युजरला दररोज 2GB डेटा ऑफर केला गेला आहे. या प्लानमध्ये एकूण 220 GB डेटा देण्यात आला आहे. यासोबत प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. जर तुम्हाला एसएमएसची आवश्यकता असेल, तर दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. याव्यतिरिक्त विनामूल्य Zing संगीत सदस्यत्व दिले गेले आहे.

BSNL चा प्लान Jio, Airtel आणि Vi पेक्षा चांगला  

ग्राहक बीएसएनएल सेल्फ केअर अॅप आणि बीएसएनएल रिचार्ज पोर्टलद्वारे नवीन 666 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लानसह त्यांच्या बीएसएनएल नंबरवरुनही रिचार्ज करू शकतात.  

जिओचा 666 रुपयांचा प्लान देखील आहे, ज्यामध्ये 84 दिवसांची वैधता उपलब्ध आहे आणि दररोज 1.5 जीबी डेटा उपलब्ध आहे. एअरटेलच्या 666 रुपयांच्या प्लानमध्ये 77 दिवसांची वैधता आणि 1.5 जीबी/दिवस डेटा मिळतो. Vi च्या 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये 77 दिवसांची वैधता आणि दररोज 1.5 GB डेटा देखील मिळतो. बीएसएनएलचा 666 रुपयांचा प्लान तिन्ही प्लानपेक्षा जास्त सरस आहे.