बीएसएनएलचा नवा प्लान; जिओ, व्होडाफोनसह एअरटेल, आयडियालाही देणार धक्का

आपले ग्राहक कायम ठेवण्यासाठी बीएसएनएलने खासगी कंपनीप्रमानेच ऑफर लॉंच करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी बीएसएनएलने नुकताच एक नवा प्लान लॉंच केला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 29, 2017, 08:54 PM IST
बीएसएनएलचा नवा प्लान; जिओ, व्होडाफोनसह एअरटेल, आयडियालाही देणार धक्का title=

मुंबई : आपले ग्राहक कायम ठेवण्यासाठी बीएसएनएलने खासगी कंपनीप्रमानेच ऑफर लॉंच करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी बीएसएनएलने नुकताच एक नवा प्लान लॉंच केला आहे.

खासगी कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा

रिलायन्स जिओने मार्टेकटमध्ये पाऊल ठेवले आणि टेलीकॉम क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली. जिओनेही मग एका पेक्षा एक धमाकेदार ऑफर आणत धक्के द्यायला सुरूवात केली. टेलकॉम कंपन्यांना खरा धक्का होता रिलायन्सची फ्री ऑफर. त्यामुळे रिलायन्सचा वारू रोखण्यासाठी एअरटेल, व्होडाफोन, आयडीयासारख्या कंपन्यांनी कंबर कसली. पण, आता एकमेवर असलेली सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलही या स्पर्धेत उतरली आहे. नुकताच बीएसएनएलने नवा प्लान लॉंच केला. चर्चा आहे की, जो रिलायन्स जिओ, व्होडाफोन एअरटेल आणि सर्वच खासगी टेलिकॉम कंपन्यांना दणका देणार आहे.

काय आहे बीएसएनएलचा प्लॅन?

बीएसएनएलने नव्या प्लाननुसार यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली आहे. यासोबतच या प्लानमध्ये यूजर्सला 1 GB हायस्पीड डेटा दिला जाणार आहे. या प्लानचे वैशिष्ट्य असे की, या प्लानअंतर्गक यूजर्स रोमिंगमध्येही अनलिमीटेड कॉल करू शकणार आहेत. या शीवाय रोमिंगमध्य इनकमींगही फ्री राहणार आहे. या प्लानची किंमत 187 रूपये इतकी आहे. या प्लानची वैधता 28 दिवसांसाठी आहे.