मुंबई : कोरोना व्हायरसमुळे भारतासह जगभरात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची मुभा दिली आहे. वर्क फ्रॉम होम करताना चांगलं वायफाय नेटवर्क असणं सर्वात गरजेचं आहे. वायफाय नेटवर्क चांगलं नसेल तर कामात अनेक अडचणी येतात. त्याचा अप्रत्यक्षपणे आपल्या कामावर परिणाम होतो. घरातील वायफायचा स्पीड स्लो असेल तर काही उपायांनी वायफायचा स्पिड काही प्रमाणात वाढवता येऊ शकतो.
चांगल्या वायफायसाठी राऊटरचं प्लेसमेंट योग्य असणं आवश्यक आहे. घरात सर्वात जास्त सिग्नल असलेल्या ठिकाणी वायफाय ठेवणं गरजेचं आहे. वायफायमध्ये सिग्नल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या रुपात मिळतं. या सिग्नलला काही ऑप्जेक्ट ब्लॉक करतात. त्यामुळे योग्य ठिकाणी राऊटर असणं महत्त्वाचं आहे. नेहमी राऊटरला इलेक्ट्रॉनिक किंवा इतर ऍप्लिकेंटपासून दूर ठेवा. राऊटरचा एक्सटर्नल ऍन्टिना बाहेर काढून राऊटर सरळ ठेवणं गरजेचं आहे. चांगल्या स्पिडसाठी एक्सटर्नल ऍन्टिनाचा वापर करता येऊ शकतो.
वायफाय राऊटर रिबूट करुनही त्याचा स्पीड वाढवता येऊ शकतो. त्यासाठी राऊटर केवळ रिबूट किंवा रिस्टार्ट करावा लागेल. घरी काम सुरु करण्यापूर्वी राऊटर एकदा रिबूट किंवा रिस्टार्ट करा, त्यामुळे स्पिड वाढण्यास मदत होईल. राऊटर रिबूट केल्यामुळे त्याची मेमरी क्लियर होईल आणि अपडेट इन्स्टॉल होण्यासाठी अधिक सक्षम होईल.
त्याशिवाय वायफाय स्पीड वाढवण्यासाठी, वायफाय एकाहून अधिक डिवाईसला कनेक्ट करु नका. अधिक लोकांसोबत आपला पासवर्ड शेअर करु नका. वायफायचा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहणं आवश्यक आहे. या काही उपायांनी वायफाय स्पीड, त्याचं नेटवर्क योग्य राहण्यास काही प्रमाणात नक्कीच मदत होऊ शकते.