Blackview BV9300: सध्या मार्केटमध्ये रोज नव नविन स्मार्टफोन लाँच होत आहेत. नवा स्मार्टफोन खरेदी करताना कॅमेरा, रॅम, डिस्प्ले, प्रोसेसर यासह आणखी एक गोष्ट विचारात घेतली जाते ती म्हणजे फोनचा बॅटरी बॅक अप. स्मार्टफोनची बॅटरी लगेत उतरते. यामुळे प्रत्येक जण फोन खरेदी करताना तगडा बॅटरी बॅकअप असलेला फोन खरेदी करण्याचा विचार करतात. मात्र, सध्या मार्केटमध्ये असलेल्या स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप हा काही तासांपर्यंतच टिकतो. मात्र, आता एक असा स्मार्टफोन लाँच झाला आहे की एकदा फोन चार्ज केल्यावर दोन महिने टेन्शन नाही. Rugged स्मार्ट फोन कंपनी तब्बल दोन महिन्यांचा बॅटरी बॅकअप असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे.
Blackview BV9300 Rugged असे स्मार्टफोनचे नाव आहे. सतत फिरत्या दौऱ्यावर असणाऱ्या युजर्सना विचारात घेवून कंपनीने हा खास फोन लाँच केला आहे. तगडा बॅटरी बॅकअप ही या फोनची खासियत आहे. प्रवासात मोबाईलचा चार्जर आठवणीने घेवून जावा लागतो. चार्जर विसरला तर बॅटरी संपूण फोन स्वीच ऑफ होतो. मात्र, या फोनमुळे चार्जर कॅरी करण्याचे टेन्शन राहणार नाही. कारण या फोनची बॅटरी तब्बल दोन महिने चालणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर हेलियो G99 चिपसेट प्रोसेसर आहे. याचा रॅम देखील 21GB पर्यंत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या फोनमध्ये 256 GB इंटरनल स्टोरेज मिळते. या स्मार्टफोन मध्ये 15080mAh क्षमतेची बॅटरी आहे. एकदा फोन चार्ज केल्यावर या फोनमध्ये तब्बल दोन महिन्यांपर्यंत बॅटरीबॅकअप मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Blackview BV9300 Rugged या फोनमध्ये बेस्ट फिचर्स असले तरी हा एक बजेट फोन आहे. या स्मार्टफोनची किंमत $191.99
म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 15,772 रुपये इतकी आहे. ऑनलाइन Blackview अधिकृत स्टोअर साइटवरून हा स्मार्टफोन खरेदी करता येवू शकतो.