1 लीटर पेट्रोलमध्ये 55 KM! ऑफिसला जाणाऱ्यांसाठी Best Bike; फिचर्सपासून विसराल पल्सर-अपाचे

Best Mileage Bike For Office Goers: तुम्ही सुद्धा रोज ऑफिसला येण्या-जाण्यासाठी एखाद्या चांगल्या बाईकच्या शोधात असाल तर या बाईकबद्दल तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 25, 2023, 01:48 PM IST
1 लीटर पेट्रोलमध्ये 55 KM! ऑफिसला जाणाऱ्यांसाठी Best Bike; फिचर्सपासून विसराल पल्सर-अपाचे title=
रोजच्या वापरासाठीही ही बाईक अगदी उत्तम पर्याय आहे

Best Mileage Bike For Office Goers: भारतामधील दुचाकी वाहन बाजारपेठ ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतासारख्या मोठ्या देशामध्ये दैनंदिन कामांसाठी कोट्यवधी लोक दुचाकीचा वापर करतात. आज खेडेगावांपासून ते शहरांपर्यंत अनेक ठिकाणी बाईक्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेकदा बाईक्स ट्रॅफिकमध्ये अडकण्यापासून आपल्याला वाचवते. तसेच बाईक्सचा खर्चही हा मोठ्या वाहनांपेक्षा कमी असतो. त्यामुळेच बरेच लोक 100 ते 125 सीसीदरम्यानच्या बाईक्सच विकत घेतात. या बाईक्सचं मायलेज चांगलं मिळतं. मात्र बाईकची पॉवर ही कमी असते. त्यामुळेच या बाईक्स हायवेवर चालवताना मनात थोडी धाकधुक असतेच. मात्र दुसरीकडे 150 सीसीच्या बाईकची पॉवर चांगली असते पण त्याचं मायलेज म्हणावं तितकं छान नसतं.

कॉलर टाइटवाली फिलिंग

आता या दुहेरी अडचणीत असलेल्या ग्राहकांसाठी एक सर्वोत्तम पर्याय बाजारात उपलब्ध आहे. ही अशी बाईक आहे ज्यामध्ये पॉवर आणि मायलेज दोघांचा उत्तम मेळ आहे. ही बाईक मायलेजसाठी प्रसिद्ध आहे. तसेच ही बाईक डिझाइनमध्येही अगदी सरस आहे. एकदम कॉलर टाइटवाली फिलिंग देणारी ही बाईक सध्या फारच चर्चेत आहे. तुम्ही ऑफिसला येण्या-जाण्यासाठी बाईकच्या शोधात असाल तर या बाईकबद्दल तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे.

कोणती आहे ही बाईक?

आपण मगासपासून या ठिकाणी ज्या बाईकबद्दल बोलतोय तिचं नाव आहे यामाहा एफझेडएस एफआय! (Yamaha FZS Fi) या बाईकमध्ये कंपनीने 149 सीसीचं सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन दिलं आहे. हे इंजिन 12.4 बीएचपी पॉवर जनरेट करतं. तसेच 13.3 एनएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता या इंजिनमध्ये आहे. बाईकमध्ये 5 स्पीड गेअरबॉक्स आहे. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 50 ते 55 किलोमीटरपर्यंत मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. या आकड्यांसहीत ही बाईक म्हणजे 150 सीसीच्या रेंजमध्ये सर्वाधिक मायलेज देणारी बाईक ठरते, यात शंका नाही.

ट्रॅफिकमध्येही उत्तम

आपल्या डिझाइनमुळे यामाहा एफझेडएस एफआय ही बाईक अनेकांचं लक्ष वेधून घेते. या बाईकची सीट फार उंच नाही. त्यामुळे कमी उंची असलेले लोकही ही बाईक आरामात चालवू शकतात. तसेच बाईकचे दोन्ही टायर हे भरभक्कम आणि रुंदीने मोठे आहेत. त्यामुळे ही बाईक हॅण्डलिंगसाठी उत्तम आहे. कमी उंची आणि उत्तम डिझाइन असल्याने ही ट्रॅफिकमधूनही सहज चालवता येईल अशी बाईक आहे. 

किंमत किती?

यामाहा एफझेडएस एफआयमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम देण्यात आळी आङे. तसेच बाईकमध्ये सिंगल-चॅनल एसबीएस, इको इंडिकेटर आणि इव्हर्टेड एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. या बाईकमध्ये कंपनीने फुल एलईडी हेडलाइट दिली आहे. तर इंडिकेटर्स आणि टेल लाइटमध्ये बल्ब आहे. या बाईकच्या ब्लूटूथ मॉडेलसाठी 3 हजार रुपये अधिक मोजावे लागतील. कनेक्टीव्हिटीबरोबर आणखीन काही फिचर्स या अपग्रेडमध्ये मिळतील. या बाईकची मुंबईमधील ऑन रोड प्राइज 1 लाख 48 हजार 965 इतकी आहे.