शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा, युनेस्कोच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष

तुम्ही आतापर्यंत डायबिटीस, हायपरटेन्शन, कॅन्सर अशा घातक आजारांबद्दल ऐकलं असेल. मात्र आता स्मार्टफोन नावाचा विकारही फोफावतो. स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरामुळे युनेस्कोनं चिंता व्यक्त केलीय. इतकच नाही तर शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा असा अहवालच दिलाय.

Updated: Jul 29, 2023, 06:26 PM IST
शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा, युनेस्कोच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष title=

Smartphone : स्मार्टफोन हा तुमच्या आमच्या जिवनाचा अविभाज्य भाग बनलाय. हातात स्मार्टफोन (Smartphone) नसलेली व्यक्ती अभावानेच पाहायला मिळेल. आपल्याकडे शाळा, कॉलेजात स्मार्टफोन वापरावर बंदी असली तरी लपून-छपून स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही. कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षणासाठी (Online Education) स्मार्टफोन हेच प्रमुख माध्यम बनलं होतं. मात्र याच स्मार्टफोनबाबत संयुक्त राष्ट्राची प्रमुख संस्था असलेल्या युनेस्कोनं एक धक्कादायक अहवाल दिलाय. जगातल्या सर्व शाळांमधून स्मार्ट फोनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी युनेस्कोनं केलीय. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होत असला तरी त्याचे अनेक दुष्परिणाम असल्याचं मत युनेस्कोनं (UNESCO) आपल्या अहवालात माडलंय. 

युनेस्कोच्या अहवालात काय? 
डिजिटल शिक्षणात अफाट क्षमता असली तरी ते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातल्या प्रत्यक्ष संवादाची जागा घेऊ शकत नाही. कोणतंही तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. शिक्षण हे मानवकेंद्रीत असायला हवं. स्मार्टफोनच्या अतिवापराचा थेट परिणाम शैक्षणिक कामगिरीवर होत असल्यानं शैक्षणिक कामगिरी खालवल्याचंही या अहवालात म्हटलय. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोणत्याही प्रकारच्या डिजिटल तंत्रज्ञानाकडे शिक्षणातील सहाय्यक घटक म्हणून पाहायला हवं अशा परखड शब्दात युनेस्कोनं आपलं मत मांडलंय. 

विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडेपणा
मोबाईलमुळे लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा हायपर टेन्शन  यासारख आजारपण वाढलेलं आहे. शिवाय डोळ्याचा त्रास आणि इतर आजारांना आमंत्रण देणारा ठरतोय. इतकंच नाही तर मैदानावर खेळण्याऐवजी मोबाईलमध्येच गेम खेळून आपला वेळ घालवत आहेत. अभ्यासासाठी दिलेला मोबाईलचा उपयोग आज कंटाळा आला की लगेच गेम खेळण्यासाठी व्हायला लागला आहे.

 युनेस्कोच्या अहवालात बऱ्याच अंशी तथ्य असल्याचं तज्ज्ञांनही मान्य केलंय. कोरोनाकाळात स्मार्टफोन ही गरज होती. मात्र ऑनलाईन शिक्षण हे शिकण्याचं कायमस्वरूपी माध्यम असू शकत नाही. कारण स्मार्टफोनवर मुलांची एकाग्रता कायम राहण्याची शक्यता कमी आहे. शिवाय बरीच मुलं ऑनलाईन अभ्यास करता करता सोशल मीडिया आणि रिल्समध्ये घुसखोरी करतात त्यामुळे अभ्यासाची लिंक तुटून जाते. आता युनेस्कोला अहवाल प्रत्येक देश किती गांभीर्यानं घेतो आणि त्यानुसार शिक्षणपद्धतीत बदल करतो हेच पाहावं लागेल. 

मोबाईल हा कधी शिक्षकाची जागा घेऊ शकत नाही. कोरोना काळात पर्याय नसल्याने मुलांच्या हाती अभ्यासासाठी मोबाईल द्यावा लागला. पण आता याचे उलट परिणाम दिसायला लागले आहेत. मोबाईलमुळे मुलं अभ्यासापासून दूर झाली आहेत. त्यामुळे वेळीच मुलांसपासून मोबाईल दूर करणे गरजेचं आहे.