दुचाकी घेणं आजपासून महागलं! ! Splendor पासून Destini पर्यंत, बाईक-स्कूटरच्या किंमतीत वाढ

Hero MotoCorp ने भारतात आपली नवी बाईक Xtreme 160R लॉन्च केली आहे. या बाईकची किंमत 1.27 लाखापासून सुरु होते. कंपनीने या बाईकमध्ये तांत्रिक बदल केले आहेत.

राजीव कासले | Updated: Jul 3, 2023, 03:38 PM IST
दुचाकी घेणं आजपासून महागलं! ! Splendor पासून Destini पर्यंत, बाईक-स्कूटरच्या किंमतीत वाढ title=

Hero MotoCorp : देशातील सर्वात मोठी टू व्हिलर कंपनी Hero Motocorp च्या बाइक (Bikes) आणि स्कूटर (Scooter) विकत घेणं आता महागणार आहे. 3 जुलाई 2023 पासून कंपनी आपल्या मोटरसाइकल (Motorcycle) आणि स्कूटरची कींमतीत बदल करणार असल्याची माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कींमतीत 1.5 टक्के पर्यंत वाढ करणार आहे. ही वाढ बाईकच्या प्रत्येक मॉडलनूसार वेगळी असणार आहे. 

Hero Motocorp कंपनीने दिले्लया माहितीनुसार टू व्हिलरच्या किंमतीत होणारी वाढ ही त्या त्या वेळच्या बाजारभावानुसार बदल असते. टू-व्हिलरसाठी लागणाऱ्या सुट्य्या पार्टसच्या वाढणाऱ्या किंमती आणि वेगवेगळे कर यानुसार कंपनीने किंमतीत बदल करत असते. ग्राहकांच्या खिशावर भर पडू नये असा कंपनीचा प्रयत्न असतो. कोरोना काळानंतर आता आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर आली आहे. कोरोना काळात वाहन विक्री व्यवसायाला मोठा तोटा सहन करावा लागला होता.

वेगवान बाईक
Hero Motocorpने भारतात नुकतीचं त्यांची आधुनिक Xtreme 160R बाजारात लॅान्च केली आहे. यात कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. यामुळे 
Xtreme 160Rला पहिल्या पेक्षा अधिक आकर्षक आणि वेगवान झाली आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने  Xtreme 160Rला 163CC क्षमतेचं सिंगल सिलेंडर, एयर आणि ऑयल- कूल्ड इंजीन लॅान्च केली. आताच्या काळाती ही सर्वात फास्ट बाइक आहे जी फक्त 4.41 सेकेंड मध्ये 0 ते 60 kmph ची स्पीड पकडते असा दावाही कंपनीने केला आहे. 

Ducati Panigale V4R भारतात लाँच
इटलीची प्रसिद्ध बाईक निर्माता कंपनी Ducati ने भारती बाजारात आपली सर्वात प्रसिद्ध  Ducati Panigale V4R लाँच केली. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असलेली या बाईकची भारतीय बाजारपेठेतील किंमत 69.9  इतकी आहे.  रेग्यूलर मॉडल असलेल्या Panigale V4 कंपनीने 1103cc क्षमतेचं इंजीन दिलं आहे. रेसिंग बाईकसारखी दिसणारी या बाईकला बाजारात मोठी मागणी आहे.