Apple आणणार चालकाशिवाय धावणाऱ्या ऑटोमॅटिक धमाकेदार कार

Apple चालकविरहित इलेक्ट्रिक कारवर जोमाने काम करत आहे आणि एका अहवालानुसार 2025 पर्यंत कार बाजारात आणण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. 

Updated: Nov 19, 2021, 02:50 PM IST
Apple आणणार चालकाशिवाय धावणाऱ्या ऑटोमॅटिक धमाकेदार कार  title=

नवी दिल्ली : Apple ही टेक कंपनी बऱ्याच काळापासून स्टीयरिंगशिवाय पूर्णपणे सेल्फ-ड्रायव्हिंग कारवर काम करत आहे. कारच्या आतील भागात ड्रायव्हरसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही आणि प्रवाशांना बसण्यासाठी यू-आकाराच्या आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ब्लूमबर्गच्या मते, Apple वॉचचे सॉफ्टवेअर एक्झिक्युटिव्ह केविन लिंच यांना वेळेवर सेल्फ-प्रोपेल्ड इलेक्ट्रिक कार सादर करण्याचे काम देण्यात आले आहे.

Apple 2014 पासून 'प्रोजेक्ट टायटन' वर काम करत आहे, जो अंडर-द-रडार तंत्रज्ञानाचा प्रकल्प आहे. Apple आता बाहेरील कंपन्यांच्या मदतीशिवाय स्वत:हून सेल्फ ड्रायव्हिंग कार बाजारात आणणार आहे.

तंत्रज्ञानाअंतर्गत सेल्फ ड्रायव्हिंग सिस्टीम, प्रोसेसर चिप आणि आधुनिक सेन्सर्सवर काम केले जात आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार  या प्रकल्पावर काम करणारे प्रत्येकजण वेळेवर सेल्फ-ड्रायव्हिंग कार तयार करण्यासाठी कटीबद्ध आहे,

परंतू या प्रोजेक्टविषयी Appleने अद्याप कोणतेही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

डिसेंबर 2020 मध्ये, रॉयटर्सने वृत्त दिले होते की Apple 2024 पर्यंत प्रवासी वाहने बाजारात आणू शकते आणि यासाठी कंपनीकडून बॅटरी देखील तयार केली जाईल.

गेल्या दशकात इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीनंतर, टेस्ला सारख्या कंपन्यांचे बाजार मूल्य खूप वेगाने वाढले आहे,

त्यामुळे अॅपलने 2024 पर्यंत आपली सेल्फ-ड्रायव्हिंग इलेक्ट्रिक कार बाजारात आणली, तर कंपनीला नक्कीच फायदा होऊ शकतो.