अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनचे हे पाच सीक्रेट फिचर्स तुम्हाला माहीत आहे का?

स्मार्टफोनमध्ये असेही काही फिचर्स आहेत ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही... आणि त्यामुळे ते त्याचा उपयोग करू शकत नाहीत. 

Updated: Apr 26, 2018, 09:48 PM IST
अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनचे हे पाच सीक्रेट फिचर्स तुम्हाला माहीत आहे का? title=

मुंबई : तुमच्याकडे असलेला अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनचे सर्व फिचर्स तुम्हाला माहीत असतील असं नाही... अॅन्डॉईड स्मार्टफोन लोकप्रिय असल्याचं आणखी एक कारण हे देखील आहे की हे स्मार्टफोन प्रत्येक किंमत आणि फिचर्ससहीत उपलब्ध आहेत. अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स आहेत. याद्वारे लोक आपले अनेक कामं आपल्या मोबाईलद्वारे पार पाडतात... हे सोयीस्करही असतं. परंतु, स्मार्टफोनमध्ये असेही काही फिचर्स आहेत ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही... आणि त्यामुळे ते त्याचा उपयोग करू शकत नाहीत. 

ठराविक कॉल रिसिव्ह करा

जेव्हा एखाद्या वेगळ्याच नंबरवरून कॉल्स किंवा मॅसेज येतात तेव्हा तुम्ही डिस्टर्ब होता. मग अशावेळी तुम्ही 'Do not disturb' हा फिचर वापरता. यामध्ये एक 'Priority' मोडही असतो. या मोडमुळे तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टला प्रायव्हसी लावता. 

घरी येताच आपोआप अनलॉक होतो स्मार्टफोन

स्मार्टफोनमध्ये एक स्मार्ट लॉकचा ऑप्शन असतो. याला स्मार्टलॉक स्मार्ट कारणामुळेच म्हटलं जातं. एखाद्या खास जागेवर तुम्ही हे लॉक लिस्टेड करू शकता, जिथं आपोआप तुमचा फोन अनलॉक होईल. म्हणजेच, तुम्हाला तुमचं घर सुरक्षित वाटत असेल तर हे स्थान तुम्ही लिस्टमध्ये टाकू शकाल. त्यानंतर तुम्ही जेव्हा कधी घरी असाल तुमचा फोन ऑटोमॅटिक अनलॉक असेल. 

जाहिराती बंद करा

स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या पर्सनलाईज्ड जाहिराती तुम्ही बंद करू शकता. स्मार्टफोनचा वापर करताना आपल्याला जाहिरातींचा त्रास होतो. हा त्रास बंद करण्यासाठी तुम्ही सेटींग - गूगल - अॅडस् - एनेबल  हा पाथ फॉलो करा. यामुळे तुमच्या फोनमध्ये पर्सनलाईज्ड जाहिराती बंद होतील. 

हार्ट रेट ट्रॅक करा

तुमचा हार्ट रेट चेक करायचा असेल आणि तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्हाला कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही. यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून 'Instant Heart Rate' अॅप डाऊनलोड करावं लागेल. अॅप सुरु केल्यानंतर कॅमेऱ्यावर तुमच्या अंगठ्याच्या बाजुचं पहिलं बोट (तर्जनी) ठेवा आणि आपला हार्ट रेट तपासा. 

स्क्रीन मॅग्नीफायर

जर तुमच्या डोळ्यांना छोट्या फॉन्टचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये एक खास व्यवस्था लागू करू शकता. यासाठी स्क्रीन मॅग्निफायरची तुम्हाला मदत होऊ शकते. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन -Accessibility - Magnification वर क्लिक करा.