Amazon Summer Sale 2019: अॅमेझॉन ऑफरचा अखेरचा दिवस

स्मार्टफोन आणि एसेसरिजवर कंपनीकडून ४० टक्क्यापर्यंत भरघोस सवलत देण्यात आली आहे.

Updated: May 7, 2019, 03:05 PM IST
 Amazon Summer Sale 2019: अॅमेझॉन ऑफरचा अखेरचा दिवस    title=

मुंबई : ऑनलाईन शॉपिगं करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी आहे. ४ मे ला अॅमेझॉनच्या  ३ दिवसांच्या समर सेल ऑफरची सुरुवात झाली होती. या समर सेलचा आज शेवटचा दिवस आहे.

अॅमेझॉनकडून या समर सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सवलत देण्यात आली आहे. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये प्रामुख्याने लॅपटॉप, स्पीकर्स आणि इतर उपकरणांसाठी ही सवलत आहे.

स्मार्टफोन आणि एसेसरिजवर कंपनीकडून ४० टक्क्यापर्यंत भरघोस सवलत देण्यात आली आहे. तसेच वन प्लस ६ टी, रेडमी ६ ए, रियलमी यू १ , होनोर प्ले आणि  विवो नेक्स यासारख्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणावर ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तसेच मार्केटरेट पेक्षा या स्मार्टफोनची किंमत काही हजारांपेक्षा कमी आहे.

प्राईम युझर्ससाठी स्पेशल

प्राईम युझर्ससाठी या समर सेलची सुरुवात ३ मे पासूनच करण्यात आली. प्राईम ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने ईएमआयचा पर्याय देखील दिला आहे. पंरतु तुमच्याकडे डेबिट कार्ड असणे बंधनकारक असणार आहे. 

तसेच बजाज फायनान्स कार्डावर देखील तुम्हाला ईएमाआयवर वस्तू घेता येणार आहेत. पंरतु यासाठी तुम्हाला किमान ४ हजार ५०० पेक्षा अधिकची खरेदी करणे बंधनकारक असणार आहे.

तसेच ज्या वस्तूंवर इएमआयचा पर्याय देण्यात आला आहे. त्या वस्तू घेताना म्हणजेच त्या ऑफरसाठी किमान ३ हजार रुपयांची खरेदी आवश्यक असणार आहे. 

आयफोन एक्सवर जोरदार सूट

अॅमेझॉनच्या या समर सेलमध्ये इतर स्मार्टफोनवर सोबतच अॅपलच्या स्मार्टफोनवर सूट देऊ केली आहे. पंरतु ही सूट केवळ आयफोन एक्ससाठीच देण्यात आली आहे. या आयफोनवर तब्बल २१ हजारची सूट दिली आहे. आयफोन एक्सची किंमत ही 91 हजार 990 रुपये इतकी आहे. पंरतु अॅमेझॉनच्या समर सेलमध्ये हा स्मार्टफोन 69 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.