मुंबई : भारती एअरटेलनं त्यांच्या पोस्ट पेड ग्राहकांसाठी नवा रेंटल प्लान आणला आहे. ४९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग 20GB इंटरनेट डेटा यासोबतच मोबाईल फोन इन्श्यूरन्स, विन्क म्यूझिक, एअरटेल टीव्ही या सुविधा देण्यात आल्या आहेत. एअरटेल टीव्हीमधून ग्राहकांना लाईव्ह टीव्ही, चित्रपट आणि प्रसिद्ध शो पाहता येणार आहेत. तसंच इन्श्यूरन्समुळे मोबाईलचं नुकसान झाल्यावरही भरपाई मिळणार आहे.
याचबरोबर एअरटेलच्या या प्लानमध्ये ग्राहकांना 200GB पर्यंतचा न वापरलेला इंटरनेट डेटा कॅरी फॉरवर्ड करता येणार आहे. एअरटेलनं रोमिंगमध्येही अनलिमिटेड कॉलिंगसाठी ४४८ रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये ग्राहकांना 70GB 4G, 3G आणि 2G डेटा मिळणार आहे.
प्रिपेड ग्राहकांसाठीही आणले नवे प्लान
एअरटेलने ४४८ रुपयांचा नवा प्लान आणण्यासोबतच ३४९ रुपयांचा प्लानही रिव्हाईज केलाय. ४४८ रुपयांच्या नव्या प्लानमध्ये ७० दिवसांसाठी दररोज ३०० कॉल मोफत मिळणार आहेत. तसेच दिवसाला १ जीबी डेटा मिळणार आहे. इतकंच नव्हे तर एक जीबी डेटा संपल्यास तुमचे नेट बंद होणार आहे मात्र स्पीड कमी होईल.
एक जीबीचा वापर झाल्यानंतर इंटरनेटचा स्पीड ६४ केबीपीएस होईल. तसेच रिव्हाईज करण्यात आलेल्या ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्स २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटाचा वापर करु शकणार आहेत. याआधी या प्लानमध्ये दिवसाला एक जीबी डेटा दिला जात होता. या प्लानमध्ये रोमिंगही फ्री आहे. तसेच आठवड्याला तुम्ही १२०० कॉल फ्री होते.