Airtel Prepaid Plan: फक्त 1 रुपए एक्स्ट्रा देऊन, 28 दिवसांची एक्सट्रा वैधता

1 रुपयांमुळे प्लॅनमधील फायद्यामध्ये कसं काय फरक पडेल? पण खरोखरच यांच्या सेवेत खूप फरक पडतो.

Updated: Mar 14, 2021, 09:06 PM IST
Airtel Prepaid Plan: फक्त 1 रुपए एक्स्ट्रा देऊन, 28 दिवसांची एक्सट्रा वैधता title=

मुंबई :  एअरटेल आपल्या Usersना आकर्षित करण्यासाठी अनेकदा आकर्षक प्लॅन्स लाँच करत असतो. बहुतांश खासगी टेलिकॉम कंपन्या बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी आपल्या सेवेचा आढावा घेतात. एअरटेल आपल्या Usersना भरपूर रिचार्ज प्लॅन देते. ज्यामध्ये कधीकधी Usersना कोणता प्लॅन जास्त चांगला आणि फायदेशीर आहे हेच ठरवणे कठीण जाते.

आज आम्ही तुम्हाला एका एअरटेल प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे 1 रुपयांच्या फरकात अनेक फायदे तुम्हाला मिळतील.

28 दिवसापेक्षा जास्तची व्हॅलीडीटी
आम्ही एअरटेलच्या 448 आणि 449 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलत आहोत, तुम्हाला वाटेल की 1 रुपयांमुळे प्लॅनमधील फायद्यामध्ये कसं काय फरक पडेल. पण खरोखरच या प्लॅनमुळे सेवेत खूप फरक पडतो. 449 रुपयांच्या प्लॅनसोबत तुम्हाला 448 प्लॅनपेक्षा 28 दिवसांची अधिक व्हॅलीडीटी मिळेल.

448 प्लान
या प्लॅनमध्ये दररोज 3GB हायस्पीड डेटा आहे. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस दिले जातात. या सर्व फायद्यांचा वापरकर्त्याला 28 दिवसांपर्यंत लाभ घेता येणार आहे. शिवाय Disney+ Hotstar VIPचे 1 वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन, प्राइम व्हिडिओ मोबाईल सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय एअरटेल Airtel Xstream Premium, विंक म्युझिक सोबत Shaw Academyचा 1 वर्षाच्या व्हॅलीडीटीसह मोफत ऑनलाइन कोर्स आणि FASTagखरेदीवर 100 रुपयांचा कॅशबॅकही उपलब्ध असेल.

Airtel 449 प्लानचे डीटेल्हस
या प्लॅनमध्ये Usersना दररोज 2GB हायस्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस देण्यात आले आहेत. 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांची व्हॅलीडीटीदेण्यात आली आहे.  या योजनेत  फ्री हॅलोट्यून्स, Airtel Xstream Premium, विंक म्युझिक आणि  प्राइम व्हिडिओ मोबाईल सबस्क्रिप्शन सह FASTag खरेदीवर 100 रुपयांचा कॅशबॅक आहे.

448 रुपयांच्या प्लॅनसह Disney Plus Hotstar VIPचा एक्सेस देण्यात येत आहे जो 449 रुपयांच्या  प्लॅनमध्ये उपलब्ध होणार नाही.