जिओला टक्कर! एयरटेलची आणखी एक धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एयरटेलनं आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे.

Updated: Sep 16, 2018, 09:08 PM IST
जिओला टक्कर! एयरटेलची आणखी एक धमाकेदार ऑफर  title=

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एयरटेलनं आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. रिलायन्स जिओला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. यावेळी मुकेश अंबानींनी जिओचे ग्राहक वाढवणार असल्याचं सांगितलं. या कारणासाठी जिओनं आणखी ऑफर आणल्या. आता एयरटेलही जिओसारख्याच ऑफर घेऊन आली आहे. एयरटेलनं 419 रुपयांचा नवा प्लान लॉन्च केला आहे.

एयरटेलच्या ऑफरवर 105 जीबी डेटा मिळणार

एयरटेलच्या नव्या प्लानवर सर्वाधिक 105 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानची व्हॅलिडीटी 75 दिवसांची आहे. ग्राहकाला दिवसाला 1.4 जीबी डेटा वापरता येणार आहे. एयरटेलच्या वेबसाईट आणि अॅपवर ही ऑफर मिळणार आहे. एयरटेलच्या 399 रुपयांच्या आणि 448 रुपयांच्या ऑफरही आहे. याची व्हॅलिडीटी 70 दिवस आणि 82 दिवस आहे.

काय आहे एयरटेलच्या प्लानमध्ये

एयरटेल ग्राहकाला 419 रुपयांच्या ऑफरमध्ये अनलिमिटेड कॉल मिळणार आहेत. पण दिवसाला 300 मिनिट आणि आठवड्याला एक हजार मिनिटांपर्यंतच बोलता येईल. या प्लानमध्ये फ्री राष्ट्रीय रोमिंग आणि दिवसाला 100 फ्री एसएमएसही मिळणार आहेत. एअरटेल टीव्ही अॅप आणि विंक म्यूझिकचं सबस्क्रिप्शनही फ्री असणार आहे.

रिलायन्स जिओचा 349 रुपयांचा प्लान

रिलायन्स जिओच्या 349 रुपयांच्या प्लानमध्ये 1.5 जीबी डेटा दिवसाला मिळतो. याची व्हॅलिडीटी 70 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला 100 फ्री एसएमएसही आहेत. या ऑफरमध्ये जिओ अॅप्सचंही सबस्क्रिप्शन फ्री आहे. जिओच्या ऑफरमध्ये 300 रुपयांपेक्षा जास्तचं रिचार्ज केलं तर 50 रुपये कॅशबॅक मिळतं. त्यामुळे जिओची ही ऑफर 249 रुपयांची आहे.