एअरटेलने ४४८ रुपयांच्या योजनेत केला मोठा बदल

एअरटेलने ही योजना रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आणली आहे

Updated: Dec 27, 2018, 11:38 AM IST
एअरटेलने ४४८ रुपयांच्या योजनेत केला मोठा बदल  title=

नवी दिल्ली : बाजारात आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी दूरसंचार कंपन्या एकमेकांना टक्कर देत आहेत. दूरसंचार क्षेत्रातील सर्व सेवादात्या कंपन्या त्यांच्या जुन्या योजनेत फेरबदल करुन नव्या योजनेचे अनावरण करत आहेत. काही दिवसापूर्वी व्होडाफोन आणि आयडिया या कंपनीने ३९९ रुपयांच्या योजनेत बदल केला होता. एअरटेलने त्यांच्या ४४८ रुपयांच्या योजनेत मोठा बदल केला आहे. ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त फायदा मिळावा या हेतूने एअरटेलने नवी योजना तयार केली आहे. ग्राहकांना प्रतिदिन १.५ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या योजनेचा कालावधी ८२ दिवसांचा असणार आहे. 

एअरटेलने ही योजना रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आणली आहे. रिलायन्स जिओच्या ४४९ रुपयांच्या योजनेत प्रतिदिन १.५ जीबी हाय स्पीड डेटा मिळत आहे. त्याचबरोबर प्रतिदिन १०० एसएमएस आणि कॉलिंग मोफत मिळणार आहे. 

या आधी एअरटेलच्या ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा मिळत असे. आता ग्राहकांना १.५ जीबी दररोज मिळणार आहे. तसेच ग्राहकांना ४१ जीबीचा अधिक वापर करता येणार आहे. त्याचसोबत प्रतिदिन १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. या योजनेचा कालावधी ८२ दिवस असून यात रोमिंगदेखील निःशुल्क असणार आहे.

मागील आठवड्यात एअरटेलने १६९ रुपयांची योजना सादर केली होती. या योजनेत ग्राहकांना प्रतिदिन १ जीबी हाय स्पीड डेटा मिळत आहे. या योजनेचा कालावधी २८ दिवस असून, यात मोफत कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.