लवकरच लॉन्च होईल नोकीयाचा ५ कॅमेऱ्यांचा स्मार्टफोन...

फेब्रुवारीत होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस २०१८ मध्ये कंपन्या आपले दमदार स्मार्टफोन्स सादर करणार आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 24, 2018, 01:04 PM IST
लवकरच लॉन्च होईल नोकीयाचा ५ कॅमेऱ्यांचा स्मार्टफोन... title=

नवी दिल्ली : फेब्रुवारीत होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस २०१८ मध्ये कंपन्या आपले दमदार स्मार्टफोन्स सादर करणार आहेत. यात सॅंमसंग, नोकीया यांसारख्या कंपन्या स्मार्टफोन्स सादर करतील. यात विशेष म्हणजे नोकिया आपला एचएमडी ग्लोबल ५ कॅमेऱ्यांचा स्मार्टफोन सादर करेल. हा फोन ८ लेंस असलेल्या Nokia OZO कॅमेऱ्याशी सार्धम्य साधणारा आहे. हा फोन नोकीयाने जुलै २०१५ मध्ये लॉन्च केला होता.

Nokia 808 PureView

यापूर्वी कंपनीने  Nokia 808 PureView आणि विंडोजवर आधारित Lumia 1020 फोन बाजारात लॉन्च केला. मीडिया रिपोर्टनुसार, नोकीयाचा हा फोन बाजारात विक्रीसाठी बर्षअखेरीसपर्यंत उपलब्ध होईल. 

नवीन प्रयोग

अॅनरॉईड फोनमध्ये डयुअल कॅमेरा तर सामान्य झाला आहे. मात्र ५ कॅमेरे एकत्र हा नवीन प्रयोग होणार आहे. या फोनचा कॅमेरा गोलाकार असेल. ज्यात ७ छेद असतील. यातील ५ छेद लेंससाठी आणि २ एलईडी फ्लॅशलाईटसाठी असतील. ५ कॅमेरा असलेल्या फोनमध्ये कमी प्रकाशात आणि प्रतिकुल परिस्थितीत सुंदर फोटोज येतील.

पातळ डिस्प्ले 

या फोनसाठी फुल स्क्रीन पातळ डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. अॅनरॉईड स्मार्टफोनची कॅमेरा क्वॉलिटी खास बनवण्यासाठी नोकीयाने जर्मन लेंस निर्माता कार्ल जाईसशी करार केला आहे. 
मोबाईल वर्ल्ड कांग्रेस नोकीया ९ हा फोन सादर केला जाईल. यात ड्युल सेल्फी कॅमेरा, पातळ बेजलचा ५.५ इंचाचा ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. नोकीया ९ मध्ये १२ आणि 13 MP चा रिअर कॅमेरा असेल आणि 250 एमएएच क्षमता असलेली बॅटरी असेल.