"मराठी डिजिटल न्यूज"मध्ये ''झी २४ तास''चा मोठा वाटा, महिन्यात ८ वरून तिसऱ्या स्थानी

झी ग्रुपला डिजिटलमध्ये सलग यश मिळतंय. या सोबतच झी डिजिटलच्या सफलतेची एक कहाणी लिहिली जात आहे. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे झी डिजिटलमध्ये भक्कमपणे पाय रोवत आहे .

Updated: May 11, 2021, 03:11 AM IST
"मराठी डिजिटल न्यूज"मध्ये ''झी २४ तास''चा मोठा वाटा, महिन्यात ८ वरून तिसऱ्या स्थानी title=

मुंबई : झी ग्रुपला डिजिटलमध्ये सलग यश मिळतंय. या सोबतच झी डिजिटलच्या सफलतेची एक कहाणी लिहिली जात आहे. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे झी डिजिटलमध्ये भक्कमपणे पाय रोवत आहे . झी डिजिटलची मराठी वेबसाईट  24Taas.com ही comscore नुसार तिसऱ्या स्थानी आली आहे, मराठीत सर्वात वेगाने प्रेक्षक संख्या वाढलेली वेबसाईट ठरत आहे.

डिजिटलच्या जगात सर्वात विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या कॉमस्कोअरने मार्च २०२१ चे आकडे जारी केले आहेत, या आकड्यांनुसार ''झी २४ तास''ची मासिक युनिक व्हिजिटर्सची संख्या ही १.२ कोटी म्हणजेच १२ मिलियन्स आहे. 

तसेच 24Taas.com च्या तुलनेत Lokmat.com, Loksatta.com आणि News18Lokmat.com प्रतिस्पर्धी क्रमश: 9.7 मिलियन, १०.४ मिलियन, १० मिलियन युनिक व्हिजिटर्स मिळवू शकले. या सर्व साईटच्या तुलनेत 24Taas.com ची ग्रोथ अतिशय वेगाने होत आहे.

24Taas.com ची ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान 1.8 पट प्रेक्षक संख्या वाढली. या दरम्यान एबीपी माझाने युनिक व्हिजिटर्समध्ये १.३ टक्के वाढ केली आहे. तसेच Loksatta.com आणि Lokmat.com ने क्रमश: 0.95 आणि 0.8 टक्के प्रेक्षक वाढवले आहेत. 

24Taas.com या वेगवान ग्रोथमागे अतिशय व्यवस्थित कंटेन्ट देण्याची आखणी करण्यात आली. मागील वर्षी कोरोनासारख्या महाभयानक साथीचा रोग सुरु असताना, सकारात्मक बातम्या देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं, यात सकारात्मक गोष्टी प्रेक्षकांसमोर ठेवल्या गेल्या.

याबाबतीत ''झी २४ तास''चे बिझनेस हेड आणि संपादक निलेश खरे यांनी सांगितलं, कोरोना व्हायरसचा प्रसार जेव्हा वेगाने होत होता आणि लोकांमध्ये भीती दिसत होती, तेव्हा 24Taas.com कडून नकारात्मक नाही, तर सकारात्मक बातम्या देण्यावर भर होता.

सकारात्मक बातम्या या काळात प्रेक्षकांनी स्वीकारल्या, प्रेक्षकांना आवडू लागल्या, यानंतर 24Taas.com ही झी २४ तासची वेबसाईट आठव्या क्रमांकावरुन महिन्याभरात तिसऱ्या क्रमांकावर आली. सकारात्मकता डोळ्यासमोर ठेवून ''चांगभलं'' नावाने, म्हणजे सगळ्यांचं भलं होवो, अशा आशयाच्या बातम्या देणारा एक कार्यक्रम सुरु करण्यात आला.

24Taas.com ने नेहमीच साध्या सोप्या भाषेचा आणि सर्वांना समजेल अशा स्वरुपात वाक्याची रचना केली आहे, यामुळे प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद लाभला आहे. लेखांमध्ये मेडिकल टर्मिनॉलॉजीचा देखील उपयोग करण्यात आला. ते देखील अतिशय साध्या सोप्या भाषेत. 

तसेच बातम्यांची हेडलाईन देखील अधिक साध्या सोप्या आणि कमी शब्दात सादर केली केली. यात नकारात्मकता येणार नाही याची काळजी घेतली गेली. 

बिझनेस हेड आणि संपादक निलेश खरे म्हणतात, खूप साऱ्या बटबटीत प्रक्षोभक बातम्या देण्यावर आमचा भर नाहीय. पण वाचकांसमोर आम्ही खूप निवडक आणि महत्त्वाच्या बातम्या देऊ देतो, यापुढे यात आणखी नवीन काही देऊ इच्छितो. 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव असताना देखील 24Taas.com च्या एका छोट्याशा टीमने खूपच उल्लेखनीय असं काम केलं आहे. या लहान टीमने  24Taas.com ला तिसऱ्या स्थानावर आणण्यात मोठा वाटा घेतला आहे.