Hyundai Aura Facelift Launch Price Features : ह्युदाय मोटर्सने (Hyundai Motors) भारतीय बाजारात नवीन ऑरा फेसलिफ्ट लॉंच (Aura Facelift Launch) केली आहे. य़ा लॉचिंगनंतर लगेचच नवीन Aura साठी बुकिंग देखील सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्येही उत्सुकता वाढली आहे. आता या 2023 ह्युंदाई ऑरा फेसलिफ्टचे किंमत किती आहे? आणि फिचर्स काय असणार आहेत? हे जाणून घेऊयात.
ऑरा फेसलिफ्टमध्ये (Aura Facelift Launch) अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. जसे नवीन ऑरा फेसलिफ्टमध्ये 1.2L Kappa पेट्रोल इंजिन 5-स्पीड MT/AMT पर्यायासह देण्यात आले आहेत. हे इंजिन 6000 rpm वर 83 PS पॉवर आणि 113.8 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. कारचे 1.2 लिटर बाय फ्युअल (पेट्रोल+सीएनजी) इंजिन 5 स्पीड एमटी ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. हे 6000 आरपीएमवर 69 पीएस पॉवर आणि 4000 आरपीएमवर 95.2 न्यूटन मीटर पिकअप टॉर्क जनरेट करते.
यासह कारमध्ये 3.5-इंचाचा मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले, फूटवेल लाइटिंग, वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, 8-इंच स्क्रीन, स्टीयरिंग व्हील माउंटेड कंट्रोल्स आणि क्रूझ कंट्रोल तसेच पुश स्टार्ट/स्टॉप बटण देण्यात आले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहायला गेले तर, यामध्ये 4 एअरबॅग्ज (स्टँडर्ड) आणि 6 एअरबॅग्ज (ऑप्शनल) यांसह 30 पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज असलेली ही सेडान कार आहे. ही कार 6 मोनोटोन कलर ऑप्शनसह येते.
दरम्यान या सर्व वरील किंमती एक्स शोरूम आहेत.