नवी दिल्ली : कार प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कराण, आता एक दमदार आणि लग्झरी कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे. बेंटले मोटर्सने भारतात आपली नवी बेटाएगा V8 लॉन्च केली आहे.
पावर स्पेसिफिकेशनचं बोलायचं झालं तर, या कारमध्ये ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 पेट्रोल इंजिन देण्यआत आलं आहे. 542 bhp ची पावर आणि 770 Nm चं टार्क जनरेट करतं, जे W12 व्हेरिएंटने 59 hp आणि 130Nm पेक्षा कमी आहे. 0 ते 100 किमी प्रति तासाचा वेग घेण्यासाठी या कारला अवघ्या 4.5 सेकंदांचा वेळ लागतो आणि या कारचा टॉप स्पीड 290 किमी प्रति तास आहे. तर, W12 व्हेरिएंटचा 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडण्यासाठी 4.1 सेकंदांचा वेळ लागतो आणि या गाडीचा टॉप स्पीड 301 किमी प्रति तास आहे.
बेंटले कंपनीने दावा केला आहे की, Bentayga V8 या गाडीची टाकी एकदा फुल केल्यानंतर 746 किमी पर्यंतचा प्रवास करु शकते. या कारच्या फ्युअल टँकची क्षमता 85 लीटर आहे. Bentayga V8 कारमध्ये 21 इंचाचे व्हील्स देण्यात आले आहेत आणि ग्राहकांसमोर २० इंचाच्या व्हील्सचाही पर्याय देण्यात आला आहे. यासोबतच बेंटले Bentayga V8 मध्ये ट्वीक्ड फ्रंट ग्रिल आणि टेल-पाईप डिझाईन देण्यात आली आहे.
कारच्या इंटेरियरमध्ये नवं वूल आणि लेदर स्टीयरिंग व्हील्स देण्यात आले आहेत. यासोबतच कारच्या दरवाजांमध्ये ग्लोस कार्बन-फायबर ट्रिम फिनिश, सेंटर कंसोल आणि डॅशबोर्ड देण्यात आले आहेत.
Bentley Bentayga V8 W12 व्हेरिएंट पेक्षा ही कार 34 लाख रुपयांनी स्वस्त आहे. भारतामध्ये या कारला 2018 रेजं रोवर SV ऑटोबायोग्राफी, रोल्स रॉयस कल्लिनन या गाड्यांची टक्कर मिळणार आहे. या दोन्ही कार भारतीय बाजारात या वर्षाच्या शेवटपर्यंत लॉन्च केल्या जाणार आहेत.
Bentley Bentayga V8 या कारची किंमत 3.78 कोटी रुपये (एक्स शोरूम मुंबई) आहे. ही कार केवळ ऑर्डर केल्यावरच उपलब्ध होणार आहे. कारची किंमत एक्सचेंज रेटमध्ये चढ-उतारामुळे बदलली जाऊ शकते.