murder case

मंजुळा शेट्येच्या हत्या प्रकरणाचा तपास स्वाती साठेंकडून काढून घेतला

भायखळा कारगृहात झालेल्या मंजुळा शेट्येच्या हत्या प्रकरणाचा तपास कारगृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडून काढून घेण्यात आलाय. यापुढे हे प्रकरण महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आलंय.

Jul 7, 2017, 03:51 PM IST

नयना पुजारी हत्याकांडात चारही आरोपी दोषी

पुण्यातली सॉफ्टवेअर इंजीनिअर नयना पुजारी हत्याकांडाप्रकरणी चारही आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे.

May 8, 2017, 01:41 PM IST

कृष्णा किरवलेंच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, सीबीआय चौकशीची मागणी

प्राध्यापक कृष्णा किरवले यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या प्रितम पाटील याला अटक करण्यात आलीय. 

Mar 4, 2017, 08:53 PM IST

भाईंदरमधील मायलेकीच्या हत्येमागे प्रियकर

भाईंदरमध्ये झालेल्या मायलेकीच्या हत्या महिलेच्या प्रियकरानेच केल्याचं समोर आलं आहे, अखेर महिलेच्या प्रियकराने मायलेकीची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे.  मयत दीपिका पैशासाठी ब्लॅकमेल करत असल्याने आपण तिला ठार मारल्याचं विनायक एपूर या आरोपीने पोलिसांना सांगितलं आहे.

Feb 1, 2017, 12:08 AM IST

बारबालेची हत्या प्रकरणी एकाला हावडामधून अटक

 उल्हासनगर मधील आशेळे गावात  राहणा-या बारबालेची हत्या करून  तिचा मृतदेह  रेक्झीनच्या बॅगेत भरून तिचा पती पसार झाला होता. अखेर दोन दिवसांनी  विठ्ठलवाडी पोलीसानी नराधम पतीला कलकत्ता येथील हावडा पोलीस ठाणे येथुन अटक केली आहे.

Nov 23, 2016, 08:14 PM IST

नागपूर शुभम महकाळ खून प्रकरणी एकाला अटक

शुभम महकाळ खून प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. Cloud seven पबचे मालक प्रमोद बम्ब्रोटवार याला अम्बाझरी पोलिसांनी केली. पब मधील मारहाणीत शुभमचा खून करण्यात आला.

Nov 22, 2016, 04:03 PM IST

कोपर्डी बलात्कार प्रकरणी ७० साक्षीदार तपासले जाणार

कोपर्डी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात युक्तीवादाला आजपासून सुरूवात झाली. या प्रकरणात एकूण ७० साक्षीदार तपासले जाणार आहेत. 

Oct 19, 2016, 10:41 PM IST

कलिना आरटीआय कार्यकर्ता हत्येप्रकरणी ४ जण ताब्यात

कलिनामध्ये ६० वर्षीय आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा हत्येप्रकरणी चार संशियातांना ताब्यात घेण्यात आलंय.  काल सकाळी साडेनऊच्या सुमारास भूपेंद्र वीरा यांच्या घरात घुसुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.

Oct 17, 2016, 11:17 AM IST