maha govt

डाळीच्या साठेबाजांवर छापासत्र सुरूच, ठाण्यातून साडेसात कोटींचं धान्य जप्त

डाळींच्या वाढलेल्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशीदेखील सरकारचं छापासत्र सुरूच आहे. ठाणे पुरवठा विभागानं आज शीळ डायघर भागातल्या चामुंडा वेअर हाऊसवर छापा टाकून ७ कोटी ७४ लाख ५८ हजार ९६० रुपयांचं कडधान्य जप्त केलं. 

Oct 22, 2015, 06:42 PM IST

महाराष्ट्र सरकारकडून २३ हजार मेट्रीक टन डाळ जप्त

राज्य सरकारनं साठेबाजांवर केलेल्या कारवाईतून तब्बल १९० कोटींची २३ हजार ३०० मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात आलीय. एकट्या मुंबईतून २२ हजार मेट्रिक टन टाळ जप्त करण्यात आली असून त्याची किंमत १६५ कोटी इतकी आहे. 

Oct 21, 2015, 04:52 PM IST

पंकूताईंच्या चिक्कीला क्लीन चीट, सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र

गाझियाबाद येथील राष्ट्रीय प्रयोग शाळेच्या रिपोर्टनुसार शासकीय चिक्की खाण्या योग्य आहे असं आज राज्य सरकार तर्फे मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आलय. त्यावर सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत.  आणि पुढील सुनावणी १६ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आलीये.

Oct 14, 2015, 05:46 PM IST

भाजपाच्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादीत ‘गृहकलह’!

शरद पवारांच्या निर्णयाला त्यांच्याच घरातून विरोध होत असल्याचं कळतंय. राज्यातील भाजप सरकारला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद असल्याचं उघड झालंय. अलिबागमध्ये झालेल्या दोन दिवसीय चिंतन शिबीरामध्ये राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची मतं पुढे आलीयेत. त्यातून नेत्यांमधील वैचारिक गोंधळ दिसून आलाय. 

Nov 20, 2014, 11:43 AM IST

धमकीच्या ई-मेलनंतर राज्यात ‘हाय अलर्ट’

देशभरात स्फोट घडवून तीन हजार लोकांना उडवून देऊ, आम्ही रांचीमध्ये पोहोचलो आहोत, असा धमकीचा ई-मेल आल्यानंतर झारखंड, दिल्ली आणि महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणेला ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला.

Dec 10, 2012, 04:10 PM IST