india vs west indies odi h2h

भारतीय क्रिकेटर्स नुसते पैसा आणि अहंकार...; कपिल देव यांनी झापलं

Kapil Dev on Indian Cricketers: 1983 च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत. जास्त पैसा आल्याने काही खेळाडू फार गर्विष्ठ झाले असल्याचं कपिल देव म्हणाले आहेत. त्यांना इतरांचा सल्ला घेणं योग्य वाटत नाही अशी टीका त्यांनी केली आहे. 

 

Jul 30, 2023, 03:36 PM IST

IND vs WI: दुसऱ्या ODI मधील पराभवानंतर कर्णधार पांड्या फलंदाजांवर नाराज; म्हणाला 'मी काही ससा नाहीये....'

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. हार्दिक पांड्याने फलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरलं. 

 

Jul 30, 2023, 09:37 AM IST

टीम इंडियाकडे सीरिज जिंकण्याची संधी, दुसऱ्या वन डेत संजू सॅमसनला संधी? अशी असेल प्लेईंग-11

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे, आता दुसरा सामना जिंकत सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 

Jul 29, 2023, 01:55 PM IST

Ind vs WI: 49 वर्षांत पहिल्यांदाच! रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने रचला जबरदस्त रेकॉर्ड

Ind vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव करत मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताने सहजपणे विजय मिळवला. या सामन्यात भारताने अनेक रेकॉर्ड रचले. दरम्यान, रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी अशा एका रेकॉर्डची नोंद केली आहे, जो 49 वर्षात पहिल्यांदाच झाला आहे. 

 

Jul 28, 2023, 10:32 AM IST

India vs West Indies: फक्त 115 धावा, 23 व्या ओव्हरलाच खेळ खल्लास; तरीही भारतीय खेळाडूंकडून रेकॉर्ड्सचा पाऊस

India vs West Indies: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखत विजय मिळवला आहे. ब्रिजटाउन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्टइंडिज संघ 114 धावांवर बाद झाला. यानंतर भारताने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या सलग नवव्या विजयाची नोंद केली. 

 

Jul 28, 2023, 08:23 AM IST