IND vs BAN 3rd ODI : 'या' खेळाडूंनी ठोकले वनडेत द्विशतक; भारताच्या पाच खेळाडूंचा समावेश
भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने सुरुवातीचे 2 सामने जिंकले असून त्यांनी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे. याचदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन हा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज आहे. ईशान किशनसमोर (Ishan Kishan) आज बांगलादेशचा प्रत्येक गोलंदाज नमला आहे.
Dec 10, 2022, 04:02 PM ISTIND vs BAN 3rd ODI | टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य; कोहलीचे शतक तर किशनचे द्विशतक
टीम इंडियाने बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य दिले आहे.
Dec 10, 2022, 03:31 PM IST