allotted

एकमेकां साह्य करू, अवघे लुटू सारे फ्लॅट...

फाम सोसायटीचे प्रवर्तक मोहन गुरनानी आणि त्यांच्या सहका-यांनी लाभार्थ्यांचे फ्लॅट वाटपात हा कथित घोटाळा तर केला आहेच. शिवाय फाम संस्थेतही मोठा आर्थिक गैरव्यवहार केला होता. 1997-98 ते 1999-2000 या कालावधीत केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी लेखापरीक्षक आर जी काब्रा यांनी मोहन गुरनानीविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी गुरनानींना अटकही झाली होती. एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक व्ही ए मुल्ला हे या प्रकरणाचे तपास करत होते. याच व्ही ए मुल्लांना नंतरच्या काळात फाम सोसायटीमध्ये 18 नंबरच्या बिल्डींगमध्ये 703 नंबरचा फ्लॅट मिळाला. हा फ्लॅट व्ही ए मुल्लांना कसा आणि का देण्यात आला, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. विशेष म्हणजे या प्रकरणात पुढे गुरनानी निर्दोष सुटले,यातच सगळं काही आलं.

Jul 7, 2014, 08:40 PM IST