बाळासाहेब-राज ठाकरेंनी केलं मतदान
मुंबई महानगरपालिकेसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. शहर आणि उपनगरांमध्ये शांततेत मतदान सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या तीन तासांत ११ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
Feb 16, 2012, 01:40 PM ISTशिवसैनिक हिच बाळासाहेबांची संपत्ती- राऊत
गेल्या ४५ वर्षात देश आणि राज्याच्या रक्षणासाठी उभे राहिलेले लाखो शिवसैनिक हीच बाळासाहेबांची संपत्ती असल्याचा पलटवार संजय राऊत यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्यावर केला आहे.
Feb 15, 2012, 04:21 PM ISTराज ठाकरेच ठरणार 'किंगमेकर' ?
येत्या महापालिका निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंगमेकरची भूमिका वठवतील. मुंबई पोलीस आणि राज्य गुप्तचर विभाग यांनी महापालिका निवडणुकीचा सर्व्हे रिपोर्ट तयार केला त्यात हे मांडण्यात आलं आहे.
Feb 11, 2012, 03:33 PM ISTशिवसेनेचं लक्ष सोन्याच्या अंड्यांवर- पवार
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू असताना शिवसेनेचे नेते मात्र मुंबईतच बसून होते. मुंबई ही शिवसेनेसाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी असून या सोन्याच्या अंड्यावर शिवसेनेचं लक्ष असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे.
Feb 10, 2012, 01:43 PM ISTमतदानाच्या तारखांना हायकोर्टात आव्हान!
मुंबई महापालिका मतदानाच्या तारखांना आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. मुंबई महापालिका कायद्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि मतदानाच्या तारखेमध्ये २१ दिवसांचं अंतर असावं लागतं.
Feb 9, 2012, 01:56 PM ISTसेना भवनाचा आधार घेणं हा दुबळेपणा- उद्धव
"कुणी कुठे सभा घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकवेळी सेना भवनाचा आधार घेणं हे दुबळेपणाचं लक्षण आहे." असा राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला.
Feb 8, 2012, 04:12 PM ISTआघाडीचा आज संयुक्त जाहीरनामा
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
Feb 8, 2012, 11:43 AM ISTकाँग्रेस बॅकफूटवर !
मुंबईची सलग सत्ता उपभोगणाऱ्या य़ुतीला खाली खेचण्याची कॉंग्रेसने पूर्ण तयारी केली होती. पण काँग्रेसच्याच अजित सावंतानी बंड करत थेट काँग्रेसच्या तिकीटवाटपातला घोळ मुंबईसमोर आणला.
Feb 3, 2012, 12:53 PM ISTराज ठरणार का 'किंगमेकर' ?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांच्या चर्चेचा विषय आहे तो राज ठाकरेंच्या मनसेचा. उमेदवारीसाठी परीक्षा, त्यानंतर मुलाखती आणि सर्वात आधी उमेदवारी यादी जाहीर करून राज यांनी बाजी मारली, पण नाराजांनी दोन दिवस केलेल्या उद्रेकानं मनसेसाठीही आव्हान सोपं नसल्याचं समोर आलं.
Feb 3, 2012, 09:03 AM ISTमहापालिकेचा शिपाई निवडणुकीच्या रिंगणात
मुंबईतल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता पालिकेचा शिपाईही उतरला आहे. शिपाई पदावर काम करणाऱ्या जिंतेद्र वळवी याला आता पालिकेचा सभागृह खुणावत आहे.
Feb 2, 2012, 06:32 PM ISTफॉर्म भरायला 'मनसे' मिरवणूक
निवडणुकीसाठी वाट्टेल ते असंच चित्र घाटकोपरमध्ये पहायला मिळालं आहे. मनसे आमदार राम कदम यांच्या विभागातील मनसेचे सहा उमेदवार निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी वाजतगाजत निघाले .
Jan 31, 2012, 09:01 PM ISTराज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिर सभागृहात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज इच्छुकांचा मेळावा होतोय. त्यात राज ठाकरे इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.
Jan 27, 2012, 09:28 PM ISTबंडखोरी टाळण्यासाठी राज ठाकरेंचा आटापिटा
अनेक जण इच्छूक आहेत. सर्व उमेदवारांची मी परीक्षा घेतली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये मनसेची प्रक्रिया उत्तम झाली आहे. सर्वांनी चांगली परीक्षा दिली आहे. उमेदवार चांगले असल्याने निवड कशी करायची हा मोठा पेच आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
Jan 27, 2012, 04:29 PM ISTआ गया है देखो 'बॉडीगार्ड' !
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आत्ता बॉडीगार्डही उतरणार आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना ट्रेन करणारा मास्टर बॉडीगार्ड अमित साखरकर शिवसेनेकडून इच्छुक आहे.
Jan 25, 2012, 10:34 PM ISTकाँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा पेच
काँग्रेस मुंबईत १६९ जागा लढवणार आहे, तर त्यांच्या कार्यालयातून तब्बल अडीच हजार अर्ज वितरित झालेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस ५८ जागा लढवणार असून ४९८ जण उमेदवारीसाठी इच्छूक आहेत.
Jan 24, 2012, 08:57 PM IST