मराठा रणरागिणींचा एल्गार, सरकारला दिला इशारा
आज मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रोसिटी कायद्यात बदल अशा विविध मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज हे वादळ मुंबईत धडकले आहे. मराठा समाजातील लाखो बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत.
Aug 9, 2017, 01:46 PM ISTमुंबईतील मराठा मोर्चाच्या भगव्या वादळाचे दोन फोटो... होताहेत व्हायरल
मराठा क्रांती मूक मोर्चासाठी अभूतपूर्व संख्येने मराठा समाज मुंबईत धडकला. राज्यभरातून मराठा बांधव मंगळवारीच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. मोर्च्यापूर्वी मुंबईतील रस्ते आणि मोर्चा सुरू झाल्यानंतर भगवामय झालेले रस्ते याचे सुंदर फोटो आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी काढले आहे.
Aug 9, 2017, 01:33 PM ISTसरकारचा वेळकाढूपणा - अजित पवार
9 ऑगस्ट ला भारत छोड़ो आंदोलन झाले. आज सकल मराठा मोर्चा आहे. 57 मोर्चे निघाले. सर्वांना वाटत होते की सरकार निर्णय घेईल, पण सत्ताधारी पक्ष वेळकाढूपणा काढत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मराठा मोर्चा संदर्भात सरकारवर टीकेची झोड उठवली.
Aug 9, 2017, 01:04 PM ISTमराठा आरक्षणावरुन सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
मराठा क्रांती मूक मोर्चाला मुंबईत सुरुवात झाली आहे. मुंबईत भगवं वादळ धडकलं आहे. मुंबईचं वातावरण मराठामय झालं आहे. तर दुसकरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधीमंडळातही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. विरोधकांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजीही केली. विधानसभेचं कामकाज सुरु होण्याआधीच आमदार आक्रमक झाले होते. अखेर विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं.
Aug 9, 2017, 12:44 PM ISTमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचं शिवसेनेला आव्हान
मराठा क्रांती मोर्चाला मुंबईत उत्साहात सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी प्रचंड गर्दी मराठा बांधवांनी केली आहे. राज्यभरातून मराठा माणूस मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेनेला आव्हान केलं आहे
Aug 9, 2017, 12:06 PM ISTमुंबईतील वातावरण झालं 'मराठा'मय
मराठा क्रांती मूक मोर्चासाठी रणशिंग थोड्याच वेळात मुंबईत धडकणार आहे. राज्यभरातून मराठा बांधव मंगळवारीच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. मोर्चेकरी मुंबईत दाखल झाल्याने मुंबईतील वातावरण मराठामय झाला आहे. सांगली, सातारा, सोलापूर येथून मराठा बांधव मुंबईत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. हातात भगवे झेंडे घेत उपनगरांमधून देखील मराठा तरुण मुंबईत दाखल होतो आहे.
Aug 9, 2017, 11:08 AM ISTबेळगावमधील मराठा बांधव मुंबईतील मोर्च्यात सामील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2017, 10:49 AM IST