आयात उमेदवार

शिवसेनेपुढे मोठे आव्हान, २१ अमराठी तर १५ आयात उमेदवारांना उमेदवारी

पालिका निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे अशी थेट लढत होणार आहे. तसेच काही ठिकाणी एमआयएमनेही आव्हान निर्माण केले आहे. तर शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही राजकीय पक्षांना आव्हान आहे.

Feb 4, 2017, 05:23 PM IST

भाजपने आयात केलेले विजयी उमेदवार

भाजपने निवडणुकीच्या तोंडावर अनेक उमेदवार आयात केले आणि त्यांना उमेदवारी दिली. या उमेदवारांपैकी २२ जणांना भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने जवळपास ५९ उमेदवार आयात केले मात्र त्यातील निम्यापेक्षा जास्त उमेदवारांना मतदारांनी घरी बसविले.

Oct 19, 2014, 06:38 PM IST

'स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला उमेदवार आयात करावे लागतात'

आम्हाला स्वबळावर सत्ता द्या, असे सांगणाऱ्या भाजपला स्वत:चे उमेदवार का मिळाले नाहीत. त्यांना दुसऱ्यांचे उमेदवार आयात का करावे लागलेत. म्हणे स्वबळ, मी म्हणतो यांच्याकडे उमेदवार नाहीत, हे काय विकास करणार? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपने आयात केलेल्या उमेदवारांची यादीच वाचून दाखविली.

Oct 6, 2014, 02:19 PM IST