आमिर खान

ठाकरेंनी केले आमिरचे कौतुक, कर्नाटकावर तोंडसुख!

आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या प्रसारणावर बंदी घालून कर्नाटक सरकारने काय मिळवले, असा सवाल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. निदान ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्याचा तरी सन्मान ठेवायचा, पण प्रांतीयतेपुढे कसले आलेय सत्यमेव जयते!

May 8, 2012, 08:33 PM IST

मनाला भिडणारा अमिरचा ‘सत्यमेव जयते’

अमिर खानचा पहिला टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’चा पहिला भाग गेल्या रविवारी प्रसारित झाला आणि या पहिल्याच शोने ट्विटरसह लोकांच्या मनाला साद घातली आहे. शो संपण्यापूर्वीच या शो संदर्भात ट्विटरवर जबरदस्त ट्विटिवाट ऐकायला मिळाला.

May 7, 2012, 05:31 PM IST

नावात आणि अभिनयातही 'आमिर'

मंदार मुकुंद पुरकर

आमीर खानचा नुकताच वाढदिवस झाला. आमीरने नुकतचं ४७ व्या वर्षात पदार्पण केलं. कयामत से कयामत तक हा आमीरचा पहिलवहिला सिनेमा १९८८ साली प्रदर्शित झाला होता. सत्तरच्या दशकात जन्मलेल्या आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या माझ्या पिढीच्या डोळ्यात या रोमाँटिक शोकांतिकेने पाणी आणलं होतं. 'पापा कहते है बडा नाम करेगा' .... हे गाणं जणु माझ्या पिढीच्या आशा आकांक्षांचे शब्दरुप होतं.

Mar 19, 2012, 10:41 PM IST

शाहरुख -आमिरमध्ये 'महाभारत' !

‘रा.वन’ बनवून झाल्यावर आता शाहरुख खानची चक्क ‘महाभारत’ बनवण्याची इच्छा आहे. पण, महाभारताने केवळ शाहरुखलाच मोहिनी घातली आहे असं नाही, तर आमिर खाननेही यापूर्वी महाभारतावर सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Jan 14, 2012, 05:38 PM IST

डाकूच्या भूमिकेला खास 'आमिर' टच

आमिर आता धूम ३ मध्ये खलनायकाची भूमिका करणार आहे पण त्याही पेक्षा चर्चा रंगली आहे ती मकबूल खानच्या चंबळ सफारीत तो डाकूची भूमिका करणार असल्याची. आमिर चंबळ खोऱ्यातल्या बचुआ डाकूची भूमिका साकारणार आहे.

Dec 21, 2011, 11:36 AM IST

'3 इडियट्स' ओलांडणार चीनची भिंत

बॉक्सऑफीसवर लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारा 'थ्री इडियट्स' सिनेमा आता चीनी रसिकांनाही मोहून टाकणार आहे. कारण ८ डिसेंबरला तब्बल ९०० प्रिंट्ससह हा सिनेमा चीनमध्ये रिलीज होतोय. विधू विनोद चोप्रा यांनी गोव्यातल्या इफ्फीत ही माहिती दिली.

Dec 3, 2011, 03:14 PM IST

आमिर सोबत ऑस्कर विजेत्याला काम करायचंय...

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये आमीरच्या लगान सिनेमावर मात करत नो मॅन्स लँड सिनेमाने बाजी मारली होती. आता याच सिनेमाचा निर्माता आणि दिग्दर्शक आमीर खानसह काम करण्यासाठी उत्सुक आहे.

Nov 27, 2011, 03:58 PM IST

लगान इन 'टाईम'

'टाइम मासिका'ने खेळावर आधारित आजवरच्या सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीत 'लगान- वन्स अपॉन अ टाईम इन इंडिया'चा समावेश केला आहे. २००१मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाला या यादीत चौदावे स्थान मिळाले आहे.

Oct 9, 2011, 01:27 PM IST