T20 world cup मध्ये युझीला का खेळवलं नाही? Dinesh Karthik ने सांगितलं खरं कारण

वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये अखेर युझवेंद्रला टीममध्ये का घेतलं नाही याचं कारण विकेटकीपर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) दिलंय.

Updated: Nov 18, 2022, 05:39 PM IST
T20 world cup मध्ये युझीला का खेळवलं नाही? Dinesh Karthik ने सांगितलं खरं कारण title=

Yuzvendra Chahal : यंदाच्या वर्ल्डकपच्या (T20 world cup) सेमीफायनलमध्ये झालेला दारूण पराभव टीम इंडियाचे (Team India) चाहते अजूनही विसरले नाहीयेत. वर्ल्डकप संपल्यानंतरही चाहत्यांच्या मनात अजून असे बरेच प्रश्न आहेत, ज्याचं उत्तर चाहत्यांना हवंय. यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, टीम इंडियाने संपूर्ण वर्ल्डकपमध्ये युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) टीममध्ये एकदाही संधी का दिली नाही. 

टी-20 वर्ल्डकप 2021 मध्ये युझवेंद्र चहलला टीममध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. लोकांनी सोशल मीडियावर मागणी करूनही त्याची प्लेईंग 11 मध्ये निवड केली गेली नाही. यावरून कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्यावर टीकाही करण्यात आली. पण अखेर युझवेंद्रला टीममध्ये का घेतलं नाही याचं कारण विकेटकीपर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) दिलंय.

एका क्रिकेट वेबसाईटशी बोलताना कार्तिक म्हणाला, तो एकदाही रागावला नाही किंवा चिंताग्रस्त झाला नाही. कारण त्यांना खात्री होती. टूर्नामेंटच्या सुरुवातीलाच त्यांना सांगण्यात आलं होतं की, कोणत्या परिस्थितीत आम्ही त्यांना खेळवणार आहोत, अन्यथा त्यांना खेळण्याची संधी मिळणं कठीण आहे.

कार्तिक पुढे म्हणाला, "त्यामुळे चहल आणि हर्षल याबाबतीत जागरूक होते. इतकंच नाही तर ते अशा पद्धतीने तयारी करत होते, जिथे त्यांना संधी मिळाल्यावर सर्वश्रेष्ठ कामगिरी करायची आहे. मात्र एक गोष्टी अशीही असून शकते जिथे त्यांना संधीही मिळणार नाही."

ज्यावेळी कोच आणि कर्णधाराकडून स्पष्टीकरण देण्यात येतं, तेव्हा एका खेळाडूसाठी ते अधिक सहज असतं. अशावेळी तुम्ही संधी मिळाल्यावर तुमचं सर्वश्रेष्ठ काम करण्याचं निश्चित करता. आणि हे दोन खेळाडू हेच करत होते. जर त्यांना संधी दिली असती तर दोघांनीही उत्तम कामगिरी केली असती, असंही कार्तिकने सांगितलंय.