Viral Video: यजुवेंद्र चहलने दिली जडेजाला खुन्नस, थेट अंगावर गेला अन्...; पाहा नेमकं काय झालं?

Yuzvendra Chahal Viral Video: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चहलला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही, त्यामुळे तो मैदानाबाहेर वावरताना दिसला. अशातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतोय

Updated: Jul 30, 2023, 07:03 PM IST
Viral Video: यजुवेंद्र चहलने दिली जडेजाला खुन्नस, थेट अंगावर गेला अन्...; पाहा नेमकं काय झालं? title=
Yuzvendra Chahal Viral Video

Ravindra Jadeja on Yuzi Chahal: भारत आणि वेस्ट इंडिज (Ind vs WI 2nd ODI) यांच्यातील दुसरा सामना बार्बाडोस येथे खेळवला गेला. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली होती. तर त्यांच्याजागी संजू सॅमसन आणि अक्षर पटेलला संधी देण्यात आली. मात्र, रोहित विराटच्या गैरहजरीत टीम इंडियाचं पितळ उघडं पडलं. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दुसरा वनडे सामना गमवावा लागला. त्यानंतर आता वनडे सिरीजमध्ये वेस्ट इंडिजने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. सामना जरी वेस्ट इंडिजने जिंकला असला तरी चर्चा होतीये ती युझी चहलची (Yuzvendra Chahal) ...

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चहलला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही, त्यामुळे तो मैदानाबाहेर वावरताना दिसला. अशातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतोय. नेमकं काय झालं पाहा...

टीम इंडिया बार्बाडोसमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरी वनडे खेळत होती, त्याच दरम्यान पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला होता. त्यामुळे सर्वजण ड्रेसिंग रूमकडे जात होते. त्याचवेळी जडेजा आणि चहल आमने सामने आले. त्यावेळी वर जात असताना चहलने बॅट आणि हेलमेटसह उभ्या असलेल्या जडेजाला गॉगल घालून खुन्नस दिली. चहल (Yuzvendra Chahal) मस्करी करतोय, याची जडेजाला जाणीव होती. चहल असं काही बोलला की, जड्डूला हसू आवरलं नाही. त्यानंतर चहलचे वेगळेच हावभाव पहायला मिळाले. त्यानंतर चहलने देखील हसताना दिसला. त्यावेळी जडेजाने गालगुच्चे घेतले. त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

पाहा Video

दरम्यान, दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय फलंदाज फेल झाल्याचं पहायला मिळालंय. कोणत्याही फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि विराट संघात नसताना ही परिस्थिती असेल तर आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया जिंकणार तरी कशी? असा सवाल आता विचारला जातोय. त्यामुळे आता ठोस निर्णय घेण्याची गरज आहे, अशी चर्चा क्रिडाविश्वात होताना दिसत आहे.