VIDEO : WWE च्या इतिहासात पहिल्यांदा, ब्रॉन स्ट्रोमॅनसोबत 10 वर्षाचा मुलगा झाला चॅम्पिअन

रॅसलमेनिया 34 चा रोमांच गेल्या काही दिवसांपासून भरपूर चर्चेत आहे. 

Dakshata Thasale Updated: Apr 10, 2018, 06:00 PM IST
VIDEO : WWE च्या इतिहासात पहिल्यांदा, ब्रॉन स्ट्रोमॅनसोबत 10 वर्षाचा मुलगा झाला चॅम्पिअन title=

नवी दिल्ली : रॅसलमेनिया 34 चा रोमांच गेल्या काही दिवसांपासून भरपूर चर्चेत आहे. हल्लीच अंडरटेकरने जॉन सीना आणि ब्रॉक लॅसनरने रोमन रेंसला या सामन्यात हरवलं आहे. रॅसलमेनियाच्या मुख्य इव्हेंटमध्ये सर्वात जास्त नजरा या ब्रॉन स्ट्रोमॅनवर होत्या. आणि याचं कारण होतं स्ट्रोमॅनचा रहस्यमय पार्टनर.  या मुख्य इव्हेंटमध्ये ब्रॉन स्ट्रोमॅनचा मुकाबला शेमस आणि सिजेरोसोबत होणार होतं. तिथेच आता शेमस आणि सिजेरोचा पार्टनर हे सगळ्यांसाठी एक रहस्यकथा आहे. शेमस आणि सिजेरोने रिंगमध्ये शानदार एन्ट्री केली. यानंतर ब्रॉन स्ट्रोमॅन आला आणि तो देखील एकटाच. 

रिंगमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर ब्रॉन स्ट्रोमॅनने आपल्या पार्टनरच्या बाबतीत खुलासा केला. आज माझा पार्टनर दर्शकांमधीलच एक असणार आहे. आणि हे ऐकताच सगळेजण हैराण झाले होते. कारण तेथे उपस्थित असलेल्या अनेक व्यक्तींना या गोष्टीवर विश्वास बसला नाही. तेव्हा ब्रॉन स्ट्रोमॅन बाहेर आला आणि आपल्या फॅन्समध्ये आपला पार्टनर शोधू लागला. 

कोण आहे ब्रॉन स्ट्रोमॅनचा पार्टनर 

ब्रॉन स्ट्रोमॅनचा हा पार्टनर 10 वर्षाचा मुलगा आहे. या मुलाचं नाव आहे निकोलस. कुणालाच सुरूवातीला काही अंदाज नव्हता. पण जेव्हा त्याने आपल्या पार्टनरला समोर आणलं तेव्हा सगळे चकित झाले. मात्र 10 वर्षाच्या निकोलसला रेसलिंग रिंगपर्यंत घेऊन गेल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.