WWE चॅम्पियन जॉन सिनाने शाहरूखचे केले कौतूक

जॉन सिनाने अजून एका भारतीय सुपरस्टारची तारीफ केली आहे.

Updated: Dec 23, 2017, 03:52 PM IST
 WWE चॅम्पियन जॉन सिनाने शाहरूखचे केले कौतूक  title=

नवी दिल्ली : १६ वेळा WWE चॅम्पियन जॉन सिनाचे नाव भारतीय फॅन्ससाठी काही नवे नाही. भारतामध्ये याचे लाखो चाहते आहेत. WWE ही अमेरिका आणि इंग्लंडनंतर भारतात  जास्त लोकप्रिय आहे. 

द्रविडचा चाहता

असा हा जॉन सिना राहुल द्रविडची चर्चा केल्याने चर्चेत आला होता.  त्याने इंस्टाग्राम पोस्टमध्ये द्रविडचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली होती. त्यामूळे सिनाचे भारतीय फॅन्स खूप खूश झाले होते. आता जॉन सिनाने अजून एका भारतीय सुपरस्टारची तारीफ केली आहे.

जॉन सिनाने यावेळी शाहरूख खानची तारीफ केली. आपल्या ट्विटमध्ये त्याने शाहरुखचा नवा शो 'टेड टॉक'ची तारीफ केली.

हा शो शाहरूख होस्ट करत आहे. 

शाहरूखच्या या शोमधील अनेक गोष्टी जॉन सिनाला भावल्या आहेत. 

जॉन सिनाच्या या ट्विटवर शाहरूखनेही मजेदार अंदाजात उत्तर दिले आहे. 

'यू कांट सी मी.'

जॉन सिना रिंग मध्ये उतरतो तेव्हा त्याचं वाक्य खूप फेमस आहे, 'यू कांट सी मी.'

'हे पाहण्यासाठी खूप धन्यवाद..तुम्हाला एक दिवस बघेन अशी माझी इच्छा आहे.माझ्या शुभेच्छा आणि सलामत रहा ही सदीच्छा' असे ट्वीट शाहरूख खानने केले आहे.