WTC Final: टीम इंडियाच्या खेळाडूंचं कसं सुरू आहे ट्रेनिंग, पाहा फोटो

टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी साउथेप्टनला पोहोचली आहे. 

Updated: Jun 6, 2021, 04:43 PM IST
WTC Final: टीम इंडियाच्या खेळाडूंचं कसं सुरू आहे ट्रेनिंग, पाहा फोटो title=

मुंबई: टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी साउथेप्टनला पोहोचली आहे. तिथे तीन दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर खेळाडू आता आपला सराव कसा करत आहेत त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. टीम इंडियाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने सकाळी धावाताना व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तर आता रविंद्र जडेजानं सरावा दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना होणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. ड्युक बॉलनं हा सामना खेळला जाणार आहे. रविंद्र जडेजानं फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे की पहिली आऊटिंग. 

रविंद्र जडेजा पीचवर गोलंदाजीचा सराव करत असल्याचं दिसत आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये विराट कोहली जडेजाला संधी देणार की अश्विनला की दोघांना हे पाहाणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.

रविंद्र जडेजाने इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत त्याने 16 विकेट्स आणि 2 अर्धशतक आपल्या नावावर केले आहेत. तर त्याने आपल्या करियरमध्ये 51 कसोटी सामने खेळून 220 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. 

Tags: