मुंबई : भारतीय कुस्तीपटू सतेंदर मलिक याने एका सामन्यादरम्यान एक लज्जास्पद कृत्य केलंय. निकाल विरोधात लागल्याने मलिक थेट रेफ्रीवर धावून गेला. त्याच्या या कृतीविरोधात आता भारतीय कुस्ती महासंघाने (WFI)त्याच्यावर आजीवन बंदीची कारवाई केली.
नवी दिल्लीत केडी जाधव स्टेडियमवर राष्ट्रकुल क्रीडा 2022 ची चाचणी होत होती. या चाचणी दरम्यान एक लाजिरवाणी घटना घडली. सामन्याचा निर्णय विरोधात दिल्याने 125 किलो वजनी गटात भाग घेणारा कुस्तीपटू सतेंदर मलिकने आपला कंट्रोल गमावला. सतेंदरने वरिष्ठ रेफ्री जगबीर सिंग यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना मारहाण केली.
त्याचं झालं असं की, अंतिम फेरी संपण्यापूर्वी 18 सेकंदापर्यंत सतेंदर 3-0 ने आघाडीवर होता, परंतू विरोधी कुस्तीपटू मोहितने टेक-डाउन केल्यानंतर त्याला मॅटवरून ढकलले. यामुळे मोहितला 3 गुण मिळणार होते, मात्र रेफ्री वीरेंद्र मलिक यांनी मोहितला टेक डाऊनचे दोन गुण दिले नाहीत. यानंतर संतापलेल्या कुस्तीपटूने या निर्णयाला आव्हान दिले.यानंतर रेफरीचा निर्णय ज्युरीकडे पाठवण्यात आला.
सतेंदर आणि सत्यदेव एकाच गावचे रहिवासी असल्याने ज्युरी, सत्यदेव मलिक यांनी या निर्णयापासून स्वतःला माघार घेतली. अशा परिस्थितीत अनुभवी वरिष्ठ रेफ्री जगबीर सिंग यांनी रिप्लेद्वारे मोहितला तीन गुण दिले. रेफ्री जगबीर यांच्या निर्णयानंतर स्कोअर 3-3 असा बरोबरीत झाला, जो शेवटपर्यंत कायम राहीला. अशा परिस्थितीत नियमानुसार सामन्याचा शेवटचा गुण मिळाल्याने मोहितला विजेता घोषित करण्यात आला.
सामना गमावल्यानंतर सतेंदरने आपला कंट्रोल गमावत सतेंदरने वरिष्ठ रेफ्री जगबीर सिंग यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना मारहाण केली. हा सर्व ड्रामा रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष अधिकारी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यासमोर घडला. या कृत्यावर त्यांनी तत्काळ रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने सतेंदरवर आजीवन बंदी घातली आहे.