WPL Auction : स्मृती मंधानाला कोटींची बोली, RCB नं घेतलं ताफ्यात

wpl auction smriti mandhana : महिला प्रीमियर लीग (WPL) साठीच्या लिलावातील पहिली बोली टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मंधानासाठी लागली होती. स्मृती मंधानाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. यावेळी लिलावात जवळपास सर्व संघांनी स्मृती साठी बोली लावली होती.

Updated: Feb 13, 2023, 05:02 PM IST
WPL Auction : स्मृती मंधानाला कोटींची बोली, RCB नं घेतलं ताफ्यात title=

WPL 2023 Auction : टीम इंडियाची स्टार बॅट्समन स्मृती मंधानाला (smriti mandhana) महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये कोटीची बोली लागली आहे. तिला रॉयल चॅंलेंजर्स बॅंगळूरूने (royal challengers bangalore) खरेदी केले आहे. त्यामुळे स्मृती बॅंगळूरूच्या ताफ्यात आल्याने संघाची ताकद वाढणार आहे. (wpl auction live smriti mandhana sold to royal challengers bangalore at rupees 3.4 crore) 

 

हे ही वाचा : ऑलराऊंडर खेळाडूंवर पैशांचा पाऊस, WPL मध्ये लागली करोडोत बोली

 

महिला प्रीमियर लीग (WPL) साठीच्या लिलावातील पहिली बोली टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मंधानासाठी लागली होती. स्मृती मंधानाची (smriti mandhana) मूळ किंमत 50 लाख रुपये होती. यावेळी लिलावात जवळपास सर्व संघांनी स्मृती साठी बोली लावली होती. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ताफ्यात आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तिला 3.40 कोटी रुपयांना विकत घेतले. विशेष म्हणजे संघाचे बजेट फक्त 12 कोटी रुपये आहे. त्यातील 3.4 कोटी तिने एकट्या स्मृतीवरच खर्च केले आहेत. आता उरलेल्या पैशातून त्यांना इतर खेळाडूंना खरेदी करावे लागणार आहे.  

हे खेळाडूही आरसीबीत

स्मृती मंधानासह आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी, सोफी डिव्हाईन आणि रेणुका सिंहला देखील खरेदी केले आहेत. बंगळुरूने ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीला 1.7 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. सोफी डिव्हाईनला बंगळुरूने 50 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले. तसेच भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंग महिला आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळणार आहे. बंगळुरूने तिला दीड कोटी रुपयांत सामील करून घेतले. अजूनही लिलाव सुरु आहेत. आता आणखीण कोणत्या खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात येतायत, हे पाहावे लागणार आहे. 

दरम्यान ऐतिहासिक महिला प्रीमियर लीग (WPL) साठीचा पहिला लिलाव आज मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) प्रथमच आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. यापूर्वी, महिला टी20 चॅलेंज स्पर्धा 'महिला आयपीएल' म्हणून खेळली गेली होती ज्यामध्ये फक्त तीन महिला संघ होते. बीसीसीआयने ते रद्द केले आणि पाच संघांच्या महिला प्रीमियर लीगची घोषणा केली. WPL 2023 लिलावासाठी निवडलेल्या 409 खेळाडूंपैकी 246 भारतीय आहेत. आठ सहयोगी देशांसह 163 खेळाडू परदेशी आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू सर्वाधिक आहेत.