MIW vs UPW : महिला प्रीमियर लीगचा (Womens Premier League 2023) अंतिम थरार आता पहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians Women) आणि यूपी वॉरियर्स (UP Warriorz) यांच्यात सध्या एलिमिनेटर सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी तगडं आव्हान एकमेकांना दिल्याचं दिसून आलंय. अशातच आता नवा वाद उभा राहिल्याचं पहायला मिळतंय. अंपायर्सकडून रडीचा डाव खेळला जात असल्याचा आरोप क्रिकेटप्रेमींकडून करण्यात येत आहे, त्याला कारण ठरतंय...मॅथ्यूजची विकेट. (WPL 2023 Rudy innings from umpires Mathews Out or Not Out Watch VIDEO and decide latest marathi news)
एलिमिनेटर (WPL 2023 Eliminator Match) सामन्यात यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या 8 ओव्हरमध्ये मुंबईने धुंवादार सुरूवात करत 62 धावा केल्या होत्या. त्यावेळी मुंबईची फक्त एक विकेट गेली होती. त्यानंतर 9 व्या ओव्हरवेळी हायवोल्टेज ड्रामा पहायला मिळाला. याचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दीपती शर्माने 9 व्या षटकातील पहिला चेंडू हेली मॅथ्यूजला (Hayley Matthews) टाकला, तो एक वाईड चेंडू होता. त्यानंतर पुढच्या बॉलवर मॅथ्यूजने लेग साइडच्या दिशेने शॉट खेळला. त्यावेळी क्षेत्ररक्षण करताना अंजली श्रावणीने (Anjali Sarvani) अप्रतिम झेल घेतला. लेग साईड लांब असल्याने फिल्ड अंपायरने निर्णय थर्ड अंपायर्सच्या पारड्यात टाकला. त्यावेळी थर्ड अंपायरने निर्णय नॉट आऊट (Not Out) घोषित केला.
— Cricbaaz (@cricbaaz21) March 24, 2023
थर्ड अंपायरने तिन्ही अॅगलच्या माध्यमातून फिल्डिंग चेक केली. त्यावेळी मॅथ्यूज नाबाद असल्याचं अंपायरने सांगितलं. त्यावर कॅमेट्रेटर्सने देखील आश्चर्य व्यक्त केलंय. बॉल हातात होता, म्हणजे मॅथ्यूज बाद झाली, असं क्लियर समीकरण असताना नॉट आऊट दिलं तरी कसं? असा सवाल नेटकरी विचारत आहेत. त्यामुळे व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा मॅथ्यूज Out की Not Out...