WTC 2021: टीम इंडियाच्या पराभवाचं कॅप्टन कोहलीनं सांगितलं कारण...

कर्णधार विराट कोहलीनं आपल्या पराभवाचं खापर फोडलं पावसावर, सांगितलं कारण पाहा काय म्हणाला?

Updated: Jun 24, 2021, 08:55 AM IST
WTC 2021: टीम इंडियाच्या पराभवाचं कॅप्टन कोहलीनं सांगितलं कारण... title=

मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. टीम इंडियाचा 8 गडी राखून ब्लॅककॅपने पराभव केला. या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं पराभवाचं कारण सांगितलं आहे. टीम इंडियानं केलेल्या चुकांमुळे टीम इंडियाच्या हातून सामना निसटला. याच लूपहोलचा फायदा किवी संघाने उचलला.

पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अनेक कारण देत सारवासारव करताना दिसला. 'पहिला दिवस पावसानं धुऊन टाकला होता आणि खेळ पुन्हा सुरू झाल्यावर मैदानावर लय आणि जम बसणं कठीण वाटत होतं. आम्ही केवळ तीन विकेट गमावल्या, पण त्यामध्ये आलेल्या नैसर्गिक व्यत्ययामुळे आमच्या खेळण्याची लिंक तुटली. नाहीतर आम्ही आणखी धावा करू शकलो असतो, असं विराट कोहली म्हणाला आहे. 

केन विल्यमसनच्या टीमचं कोहलीनं अभिनंदन केलं. किवी संघाने आमच्यावर दबाव आणला नाहीतर आम्हीच खऱ्या विजयाचे हकदार होतो असं विराट कोहली म्हणाला. किवी संघाने खूप चांगल्या पद्धतीनं भारतीय संघांच्या चुकांचा फायदा उचलला. 

टीम इंडियाचे लूप होल ओळखून त्याचा फायदा घेऊन टीम इंडियावर 8 विकेट्सनं मात केली. भारताला दुसऱ्या डावात केवळ 170 धावा करता आल्या. तर एकूण 6 दिवसांच्या सामन्यात टीम इंडियाने 139 धावांचं लक्ष्य किवीला दिलं. किवीचे 4 फलंदाज टीम इंडियावर भारी पडले. 

न्यूझीलंड संघाने WTC 2021च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या न्यूझीलंड संघाला बक्षीस रक्कम म्हणून 1.6 लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात ही रक्कम 11.72 कोटी मिळणार आहेत. उपविजेत्या भारतीय संघाला 5.85 कोटी रुपये मिळणार आहेत.