वर्ल्डकप २०१९ विजेत्या टीमला मिळणार इतके कोटी

वर्ल्डकप स्पर्धेला ३० मे पासून सुरुवात होत आहे.   

Updated: May 17, 2019, 05:56 PM IST
वर्ल्डकप २०१९ विजेत्या टीमला मिळणार इतके कोटी   title=

दुबई : क्रिकेट वर्ल्डकप २०१९ ला अवघे काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. याआधी आयसीसीने यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या बक्षीसं जाहीर केले आहे. आयसीसीने ठरवलेल्या बक्षीसामुळे वर्ल्डकप जिंकणारी आणि उपविजेता टीम मालामाल होणार आहे.

आयसीसीने वर्ल्डकप विजेत्या टीमला ४० लाख अमेरिकन डॉलर्सच बक्षीस जाहीर केलं आहे. ४० लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळपास २८ कोटी रुपये. त्यामुळे विजेती टीम चांगलीच मालामाल होणार आहे. तसेच उपविजेत्या टीमसाठी आयसीसीकडून ८ लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देण्यात येणार आहे. आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेली रक्कम ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम ठरली आहे.

वर्ल्डकप स्पर्धेला ३० मे पासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया वर्ल्डकपसाठी २२ मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. वर्ल्डकपसाठी १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. २३ तारखेला इंग्लंडला १४ खेळाडू जाणार हे निश्चित आहे. पंरतु केदार जाधवला झालेल्या दुखापतीमुळे तो जाणार की नाही, याबाबत शंका आहे.

टीम इंडिया वर्ल्डकपमधील आपली पहिली मॅच ५ जून रोजी खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला सामना होणार आहे.

एकूण ४५ दिवस वर्ल्डकप रंगणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामना हा क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. हा अंतिम सामना १४ जुलै रोजी खेळला जाणार आहे.