मुंबई : महिला बिग बॅश लीगमध्ये (Women's Big Bash League) भारतीय खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली आहे. सिडनी (Sydney Thunder) आणि मेलबर्न (Melbourne Renegades) दरम्यानच्या सामन्यात भारतीय महिला फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. हरमनप्रीतच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चुरशीच्या सामन्यात मेलबर्नने चार धावांनी शानदार विजय मिळवला.
महिला बिग बॅश लीगमध्ये स्मृती मानधनाने शानदार शतक झळकावलं. तीने 114 धावा केल्या. या लीगमधली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.
याआधी ऍशले गार्डनरने (Ashleigh Gardner) बिग बॅशमध्ये 114 धावांची खेळी केली होती. बिग बॅश लीगमध्ये शतक झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय फलंदाज आहे. मात्र, शतकानंतरही स्मृती आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
स्मृती, हरमनप्रीतचा धडाका
या सामन्यात तब्बल 346 धावांची बरसात झाली. यापैकी 195 धावा या केवळ स्मृती आणि हरमनप्रीतने केल्या. विशेष म्हणजे या सामन्यात दोघीही नाबाद राहिल्या. मेलबर्नसाठी खेळणाऱ्या हरमनप्रतीने 55 चेंडूत नाबात 81 धावा केल्या. तिच्या शानदार खेळीच्या जोरावर मेलबर्न संघाने सिडनी संघासमोर विजयासाठी 176 धावांचं आव्हान ठेवलं.
विजयाचं लक्ष्य समोर ठेऊन खेळणाऱ्या सिडनी संघाने जोरदार प्रत्युत्तर दिलं, पण त्यांना 171 धावाच करता आल्या आणि अवघ्या 4 धावांनी पराभव पत्करावा लागला. सिडनी संघातर्फे स्मृती मानधनाने अवघ्य 64 धावांमध्ये नाबाद 114 धावा केल्या. पण तिला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.
Smriti Mandhana has equalled Ashleigh Gardner's record for the highest WBBL score ever!
For her stunning century, she's the @WeberBBQAusNZ Player of the Match #WBBL07 pic.twitter.com/mcctQ1cOj8
— Weber Women's Big Bash League (@WBBL) November 17, 2021
हरमनप्रीतची अष्टपैलू कामगिरी
फलंदाजीत कमाल करणाऱ्या हरमनप्रीतने गोलंदाजीतही चमक दाखवली. शेवटच्या षटकात सिडनी संघाला विजयासाठी 13 धावांची आवश्यकता असताना हरमनप्रीतने केवळ 8 धावा देत संघाला विजय मिळवून दिला.
जेमिमाह, दिप्तीची खराब कामगिरी
मेलबर्न संघाची सुरुवात करणाऱ्या जेमिमाह रॉड्रिक्सने या सामन्यात खराब कामगिरी केली. अवघ्या चार चेंडूचा सामना करत ती पॅव्हिलिअनमध्ये परतली. तर सि़डनीकडून खेळणाऱ्या दिप्ती शर्मालाही खास कामगिरी करता आली नाही. तिने 2 ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या आणि एकही विकेट घेता आली नाही.