'या' 5 महिला क्रिकेटर सौंदर्यात कोणत्याही हिरोइनपेक्षा कमी नाहीत, पाहा फोटो

'या' महिला क्रिकेटर सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींनाही सोडतात मागे, फोटो पाहिलेत का तुम्ही?

Updated: Oct 14, 2022, 07:45 PM IST
'या' 5 महिला क्रिकेटर सौंदर्यात कोणत्याही हिरोइनपेक्षा कमी नाहीत, पाहा फोटो  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते. यामध्ये जे रियल स्टार असतात, ते मागे राहतात. जसे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या महिला खेळाडू. देशासाठी मोठी कामगिरी करतात मात्र त्या चर्चेतच नसतात. अशाच काही महिला क्रिकेटर आहेत, ज्या क्रिकेटसह, सौंदर्याच्या बाबतीतही आघाडीवर आहेत, कोण आहेत या महिला क्रिकेटर जाणून घ्या. 

स्मृती मानधना
स्मृती मानधना (smriti mandhana) ही वुमेन्स टीम इंडिया संघातली एक उत्कृष्ट खेळाडू आहे. स्मृती मानधना मैदानात तिच्या फलंदाजीसाठी ओळखली जाते. यासोबतचं ती सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस आणि जबरदस्त लूकमुळे चर्चेत असते. क्रिकेट चाहत्यांना स्मृती मंधानाचा प्रत्येक लूक आवडत असतो. 

हरलीन देओल
हरलीन देओल (harleen deol) ही भारतीय क्रिकेट संघाची महान खेळाडू आहे. प्रत्येकजण तिच्या फलंदाजीचे कौतुक करतात. हरलीन देओल केवळ तिच्या क्रिकेटमधील चमकदार कामगिरीसाठीच नाही तर सोशल मीडियावर तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठीही चांगलीच लोकप्रिय आहे.

एलिस पेरी 
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची खेळाडू एलिस पेरी (Ellyse Perry) तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अॅलिस पेरी नेहमीच तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. एलिस पेरी ही जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक मानली जाते.

सारा टेलर 
इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची माजी खेळाडू सारा टेलर (sarah taylor) ही एक धडाकेबाज विकेटकीपर म्हणून प्रसिद्ध आहे. सारा टेलर सोशल मीडियावर तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. जवळपास 13 वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर सारा टेलरने 2019 मध्ये क्रिकेट जगताचा निरोप घेतला.

कायनात इम्तियाज 
कायनात इम्तियाज (Kainat Imtiaz) ही पाकिस्तानी महिला क्रिकेट संघाची एक उत्कृष्ट खेळाडू आहे. कायनात नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. कायनातने पाकिस्तानसाठी 15 टी-20 आणि 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत.